या घटनेत दोषी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी




खारघर घटनेत दोषी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पालघर येथे मृत्यू पावलेल्या घटनेसाठी दोषी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.

दिनचर्या :-
चंद्रपूर :-
१६ एप्रिलला खारघर येथे "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" वितरण सोहळ्यात आयोजकांच्या आणि शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे १५ च्या वर निष्पाप श्रीअनुयायांचा बळी गेला.अनेक लोकं गंभीर झाले ते आजही दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहेत.पिण्याच्या पाण्याची सोय न ठेवणे,उपस्थित लाखो लोकांसाठी मंडपाची व्यवस्था न करता, ७-८ तास त्यांना तापत्या उन्हात उघड्यावर बसविले, उष्माघाताचा फटका बसलेल्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकासेवा न ठेवणे,एवढ्या मोठ्या स्तरावरचा कार्यक्रम करण्याचा अनुभव नसणाऱ्या कंत्राटदाराला या कार्यक्रमाच्या नियोजनाचा कंत्राट कसा देण्यात आला.अश्या अनेक बाबींची सखोल चौकशी करून,या संपूर्ण घटनेला जबाबदार लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.रवींद्रसिंह परदेशी यांना जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,शहर जिल्हाध्यक्ष श्री.राजीव कक्कड,ज्येष्ठ नेते श्री.हिराचंद बोरकुटे,महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,मनपा गटनेते दीपक जयस्वाल,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कातकर,युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे,माजी नगर सेवक राजेंद्र आखरे,बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे,अरिफभाई,सरस्वती गावंडे,सुरेश पाईकराव,राहुल देवतळे,नंदकिशोर जोगी,इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दिनचर्या न्युज