रामगुंडेवार या वनपालला चंद्रपूर( वर्ग 3) यांना लाचेच्या गुन्ह्यामध्ये सजा ठोठावली
श्री. राजेश रुषीजी रामगुंडेवार वय ५० वर्ष नौकरी वनपाल, कार्यालय वनक्षेत्र सहायक घोसरी पोंभुर्णा ता. मुल जि. चंद्रपूर (वर्ग-३) यांना लाचेच्या गुन्हामध्ये सजा ठोठावली
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
श्री. राजेश रुषीजी रामगुंडेवार, वनपाल, कार्यालय वनक्षेत्र सहायक घोसरी पोंभुर्णा ता. मुल
जि. चंद्रपूर (वर्ग - ३) यांचे विरूध्दचे दाखल लाचेच्या खटल्यामध्ये दि. २४.०४.२०२३ रोजी श्री. जी.
जी. भालचंद्र जिल्हा न्यायाधिश १ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश चंद्रपूर जि. चंद्रपूर यांनी आरोपी राजेश
रामगुंडेवार यांस कलम ७ मध्ये २ वर्ष सजा २५,०००/रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा
कारावास. कलम १३ (२) मध्ये ३ वर्ष सजा व २५,०००/रू दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा
कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत थोडक्यात हकीगत याप्रमाणे आहे की, तक्रारदार रुस्तम ग्यानोबा चव्हाण यांना आरोपी , राजेश रुषीजी रामगुंडेवर यांनी लोकसेवक म्हणुन मिळालेल्या अधिकाराचा दुरपयोग करुण गैर मागनि स्वताची आर्थीक प्राप्ती करुण घेण्याचे उद्देशाने फिर्यादी यांचेकडे अवैद्य सागवान लाकुड असुन तक्रारदाराविरुध्द प्राप्त तकारीच्या अनुशंगाने कारवाई करण्यात येणार असे भासवुन तक्रारदार यांचेविरुध्द कार्यवाही न करण्याचे अनुग्रह दाखवुन तक्रारदारास ५०००/ रु. ची मागणी करुण स्वतः पंचसाक्षीदारासमक्ष स्विकारल्याने पोलीस स्टेशन, मुल येथे दिनांक १९/०३/२०१३ रोजी अप क. ३०१३/१३ कलम ७ (१३) (१) ड, सह. १३ (२) ला.प्र.का. १९८८ अन्वये दाखल करण्यात आला होता..
सदर प्रकरणाचे तपासाअंती श्री. राजेश शिरसाठ तत्कालीन पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी तपास पूर्ण करून दोषा. पत्र क. ०९/२०१४ अन्वये विशेष खटला क्रमांक ०३/२०१४ प्रमाणे मा. विशेष न्यायालय चंद्रपूर जि. चंद्रपूर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता श्री. संदिप नागपूरे कोर्ट चंद्रपूर जि. चंद्रपूर यांनी अतिशय मेहनतीने अभ्यासपुर्वक युक्तीवाद करुन लाचखोरांना चपराक बसविणेकामी अत्यंत मोलाचे काम केलेले असून आपल्या अशीलाची बाजू भक्कमपणे मांडली, तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे श्री. राहुल माकनिकर, पोलीस अधिक्षक, श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, याचे मार्गदर्शनात चंद्रपूर कार्यालयाचे प्रमुख श्री. अविनाश भामरे, पोलिस उप अधीक्षक याचे मार्गदर्शनात पो.हवा. अरुण हटवार यांनी काम पाहीले.
वरील निकालामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांचेवर निश्चितपणे परिणाम होईल व भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसेल, मा. न्यायमुर्तीनी भष्टाचारास आळा बसेल असा अतिशय चांगला निकाल दिलेला असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये निकालाबाबत चर्चा सुरु झालेली आहे. श्री. अविनाश भामरे, पोलिस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय चंद्रपूर यांनी जिल्हयातील जनतेला भ्रष्टाचाराविरूध्द जास्तीत जास्त पुढाकार घेऊन तकार देण्याचे आवाहन केलेले आहे. तरी कोणत्याही व्यक्तिस सरकारी अधिकारी/कर्मचारी कायदेशीर कामाकरीता लाचेची मागणी करीत असल्यास नागरीकांनी चंद्रपूरचे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१. अथवा टोल फ्री क्र.१०६४ वर संपर्क करावा.