जागतिक महिला दिनी चंद्रपूर पंचायत समितीत बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- ८/३/२०२३
चंद्रपूर पंचायत समितीमध्ये आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी पंचायत समिती परिसरात शेड उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
विश्व महिला दिन, महिलांचा सन्मान, महिलांचाआदर, महिलांना रोजगाराच्या संधी व बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याचे विविध माध्यमे यासाठी शासनाने 'उमेद ' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौन्नती अभियान, ग्रामविकास व पंचायत राज विभाग या माध्यमातून स्वयंरोजगार करता यावा यासाठी 'उमेद' राबवण्यात येत आहे .
सर्वप्रथम विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमालार्पण करण्यात आले. पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला . ते म्हणाले की ,या महिला बचत गटांच्या सहकार्यासाठी धारिवार इनस्ट्रक्चर कंपनीकडून स्वयंरोजगारासाठी इथे सेड उपलब्ध करून दिले. परिसरात जिल्हा प्रशासनाचे अनेक कार्यालय असून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना किंवा येणाऱ्या नागरिकांना गरजेनुसार वेगवेगळे नाश्त्यांचे पदार्थ, महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळता या ठिकाणी नियमित महिलांनी स्वयंरोजगार करावा कुठल्याही परिस्थितीत आपण सुरू केलेली व्यवसाय बंद पडता कामा नये असे आवर्जून महिला बचत गटाच्या उद्घाटन उपरोक्त ते बोलत होते. यावेळेस पंचायत समितीतील सर्व अधिकारी,कर्मचारी, महिला कर्मचारी यांची उपस्थिती होती.