प्रशासनाने जागा न दिल्यास गांधी चौकात 6 जून रोजी भूमिपूजन करणार - छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ




प्रशासनाने जागा न दिल्यास गांधी चौकात 6 जून रोजी भूमिपूजन करणार - छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जटपुरा गेट किंवा गांधी चौक येथे जागा देण्याची मागणी

छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे भव्य धरणे आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 21 /3/2023
अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एकही स्मारक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहराच्या केंद्रस्थानी उभारण्यात यावा याकरिता दिपक बेले यांचे नेतृत्वात मागील 20 वर्षांपासून छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ प्रयत्न करीत आहे . जटपुरा गेट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्या देण्यात यावी या हेतूने मंडळाने आजपावतो प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला.जटपुरा गेट येथील महानगरपालिकेच्या संकुलासमोर पुतळा उभारण्याबाबत महानगरपालिकेच्या आमसभेत सर्वानुमते ठराव सुद्धा घेण्यात आला. मात्र पुरातत्व विभागाचा नियम आड येत असल्याने जटपुरा गेट येथील जागेला मंजुरी देण्यास प्रशासन टाळाटाळ करित आहे.

तर गांधी चौक येथील जागा तात्काळ देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन
प्रशासनाने या धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यास. येणाऱ्या सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेसाठी गांधी चौकाच्या आवारात भूमिपूजन करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे देण्यात आली. आणि येत्या शासकीय शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्यांचे लोकार्पणही होईल.
मागील 20 वर्षांपासून पाठपुरावा व प्रयत्न करूनही जागेचा प्रश्न सुटत नसल्याने छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाने गांधी चौक येथील जागेचा पर्याय प्रशासनाला दिला. गांधी चौक येथे मनपा इमारतीला लागून असलेल्या वाहनतळाच्या सुरुवातीला छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता तात्काळ जागा मंजूर करावी अशी मागणी स्मारक मंडळांने केली. दोन दशकापासून शहरांमध्ये प्रयत्न करूनही शहरात छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळा शहरातील केंद्रस्थानी उभारण्यात यावा ही तमाम शिवभक्तांची भावना आहे. या भावनेची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ मनपा इमारतीच्या बाजूच्या जागेला मंजुरी द्यावी किंवा जटपुरा गेट येथील जागेकरिता पुरातत्व विभागाकडून तातडीने शिथिलता यावी या मागणीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात दीपक बेले , पप्पू देशमुख, गजानन गावंडे, निमेश मानकर, देवेंद्र बेले,शैलेश जुमडे, भारत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, यास अनेक पक्षाचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पुढील 15 दिवसात जागेच्या मुद्द्यावर तोडगा न काढल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मागणी करिता चंद्रपूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा यावेळी स्मारक मंडळातर्फे प्रशासनाला देण्यात आला. धरणे आंदोलनानंतर स्मारक मंडळाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले.