शासनाच्या वेळ खाऊ धोरणा विरोधात चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटुशनचे कर्मचारी बेमुदत संपावर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर पोंभुर्णा :-
चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटुशन ता. पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथे आज दि.,२० फेब्रुवारी,२०२३ रोज सोमवारपासून शासनाच्या वेळ खाऊ धोरणा विरोधात चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटुशनचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत !वारंवार आश्वासन देऊन शासनाने वेळ खाऊन थोरण अवलंबल्यामुळे अखेर आज महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बेमुदत संपावर जाण्याची पाळी आली आहे.
शासनाच्या आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन, सातवा वेतन आयोगाचा आजपर्यंतचा .., याबाबतच्या शासन विरोधी धोरणाच्या विरोधात महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संपात महाविद्यालयीन १०० टक्के कामकाज बंद करून उपस्थित झाले. यावेळेस कर्मचाऱ्याकडून नारेबाजी करण्यात आली शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिंदाबाद.... शिक्षकेतर कर्मचारी एकता जिंदाबाद. अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
श्री हर्षद गंधेवार, श्री अतुल अल्याडवार, श्री निखिल राचलवार, श्री अजय श्री पंकज, श्री अंकुश व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.