'भाऊचा' बुलडोझर चालला अतिक्रमणावर, वन विभाग,मनपा, पोलीस विभागाची संयुक्त कारवाई.




'भाऊचा' बुलडोझर चालला अतिक्रमणावर, वन विभाग,मनपा, पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- :-
चंद्रपूर आज सकाळी 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर मुल रोडवर वन विभागाच्या हद्दीत असलेले अतिक्रमण हटवण्यात आले.
वन विभागाच्या जागेत असलेले अतिक्रमण बरेच वर्षापासून स्थान बंद झाले होते. चंद्रपूर कडून मूल कडे जाणारा महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. अशातच इथून जाणाऱ्या वाहनांना, शहराच्या विकासात अडथळा येत असल्याने. वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईने या रस्त्यावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटवण्यात आले. यासाठी 'भाऊच्या' बुलडोजरने संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमणधारकांना कुठलेही नोटीस व साधी माहिती न देता, यांच्या अतिक्रमावर भाऊचा बुलडोजर चालवण्यात आला. प्रत्यक्षदर्शनी नागरिकाच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण धारक नागरिकांना त्यांच्या रोजी रोटीच्या व्यवसायापासून शेकडो नागरिकांना बेदखल करण्यात आले. काही अतिक्रमणधारकांनी पक्के शेड बांधल्याचेही चित्र दिसून आले होते. वन विभागाने यापूर्वीच कारवाई केली असती तर लाखो रुपये खर्च केलेले व्यर्थ गेले नसते.
त्यामुळे वनविभागाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ढाब्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, वनविभागाने जागा रिकामी केली आहे. या अतिक्रमावर चाललेल्या भाऊच्या बुलडोझरची चंद्रपूर शहरात चांगली चर्चा रंगत आहे.