वाहतूक नियंत्रण शाखेत 'दिनचर्या' दिनदर्शिकाचे प्रकाशन
दिनचर्या न्यूज
चंद्रपूर:- 3/1 /2023
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात 'दिनचर्या' दिनदर्शिकाचे प्रकाशन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, महानगरपालिकेच्या आयुक्त विपिनजी पालीवाल, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर मुंधडा, डॉक्टर दास, तथा सदस्य दिनेश जुमडे, वनश्री मॅडम, सपना नामपल्लीवार, संपादक दिनेश एकवणकर, पत्रकार मिलिंद वाळके, पत्रकार नरेश निकुरे, वाहतूक शाखेचे पोलीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्त्याचे वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिनजी पालीवाल यांची प्रमुख उपस्थितीत . या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दिनचर्या दिनदर्शिकाचेही प्रकाशन करण्यात आले असून. दरवर्षीप्रमाणे ही वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिनदर्शिका नवीन वर्षाची भेट दिली जाते.
हा उपक्रम मागील पाच वर्षापासून सुरू असून नेहमी सुरू राहावे, अशी सदिच्छा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.