भिवापूर वार्ड, सुपर मार्केट मधील गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने ठोकले टाळे





भिवापूर वार्ड, सुपर मार्केट मधील गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने ठोकले टाळे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर १६ जानेवारी : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. १६ जानेवारी रोजी मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाद्वारे भिवापूर वॉर्डातील मनपा मालकीच्या सुपर मार्केट मधील २ गाळ्यांना सील करण्यात आले.
भिवापूर वार्ड येथील सुपर मार्केट मधील गाळा क्र. ८३०, गाळेधारक अब्दुल रफिक सत्तार शेख यांच्याकडे रुपये ६४२७३/- तर गाळा क्र. ८३८, गाळेधारक प्रशांत पंदीलवार तर्फे गणेश गोरडवार यांचेकडुन रुपये १,९२,६२९/- इतकी रक्कम भाडे स्वरूपात थकीत असल्याने तसेच मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या दोन्ही गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.
सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मालमत्ता कर पथकाने केली.