संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजने अंतर्गत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा - पकज ढेंगारे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-१३/१/२०२३
महाराष्ट्र राज्य शासनाने, ग्रामीण भागासाठी अनेक योजनाचे प्रयोजन केले आहे. मात्र शासनाच्या अनेक त्रासदायक अटीमुळे, ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून दरवर्षी काही प्रमाणात मानधन स्वरूपात आर्थिक लाभ मिळत असतो. त्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे शासनाचे निर्देश असतात. मात्र एकदा शासन निर्णयाप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे करत असताना शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता या ज्येष्ठ नागरिकांनाही उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पहिलेच लाभार्थ्याकडे उत्पादनाचे उत्पन्नाचे साधन नसते. त्यांना तलाठ्याकडे 20 हजाराच्या उत्पन्नाच्या दाखला देण्यासाठी तलाठी टाळाटाळ करतो. मग लाभार्थ्याने उत्पन्नाचा दाखला आणायचा कसा?
उलट शासनाने निराधारांना 'आधार' देण्याऐवजी लाभार्थ्याला आर्थिक उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्रास देण्याचा उपक्रम शासनाने केला आहे.
विशेष सहाय्य योजना.
संजय गांधी निराधार अनुदान योजना.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना. या योजनेचा लाभार्थ्यांना फायदा होण्याऐवजी उत्पन्नाच्या साधनाने यातील प्रश्न निर्माण केला आहे!
ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्त्याना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करण्यात येत असते. आता त्या लाभार्त्याना हृयात प्रमाणपत्रा सोबत उत्पन दाखला जोडन्यात यावा ही मागणी जटिल मागणी करत असल्यामुळे ग्रामीण भागातील निराधार नागरिकाना नाहक त्रास सहन करा लागत आहे. हा त्रास होत असल्यामुळे आपन संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना त्या मध्ये उत्पन्न दाखला ही अट रद्द करण्यात यावी.
अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य पंकज ढेंगळे, तहसीलदार निलेश गौड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिनचर्या न्युज