शहरातील वाहतूक पोलीस trapik police व मनपा mnp प्रशासन या वाहतूक कोंडीकडे लक्ष देतील का? chandrapur
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील सर्वात जास्त जटिल समस्या ही शहरातील वाहतूक कोंडीची आहे. प्रत्येक गल्ली मधील रस्त्याच्या कडेला व्यवसायिकाची दुकाने थाठले आहेत. मात्र त्यांना कुठलीही वाहन पार्किंगची जागा उपलब्ध नाही.
असा वाहतुकीच कोंडीचा प्रश्न चंद्रपूर शहरातील मध्यभागी असणाऱ्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मागील बाजूस अरुंद रस्त्यात मेडिकल कॉम्प्लेक्स, अनुजा बार, या व्यवसायिकांना पार्किंग व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावरच चार चाकी, टू व्हीलर्स,वाहने उभे असतात. त्यामुळे येथील शाळेत जाणाऱ्या मुलांना ,स्कूल बसेस व स्थानिक लोकांना या मार्गावरून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. वाहने उभी रस्त्यावर असल्याने सामान्य माणसांना चालण्यास खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. छोट्या मोठ्या अपघातास निमंत्रण देणारा हा रस्ता असून याकडे चंद्रपूर शहरातील मनपा प्रशासन व पोलीस वाहतूक यांच्या संयुक्त रीतीने वाहतूक समस्या सोडवण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.
रस्त्यात वाहन उभे असल्यामुळे शाळेतील मुला मुलींना याचा भयंकर त्रास होत आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने भविष्यात वादाचे कारणही घातपात होऊ शकतात. म्हणून चंद्रपूर शहरातील नागरिकांची मागणी आहे की, या ठिकाणी होत असलेल्या वाहतुकीच्या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित वाहतूक पार्किंग नसलेल्या व्यवसायिकानांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.