दलालांनी बोगस कागदपत्रे बनविले, सिटीपीएस मध्ये नोकरभरती चा महाघोटाळा उघड! संबंधित रॉकेटचा पडदापास करून कारवाई करा - बळीराज धोटे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील आशिया खंडात असलेला सर्वात मोठा महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त 52 गावातील नागरिकाच्या जमिनी या प्रकल्पासाठी हस्तांतरित केल्या. च्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून घेण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी नोकर भरती चा महाघोटाळा झाल्याचे आज पत्रकार परिषद मध्ये स्वयं सन्मान चळवळीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे, दिलीप बोरे, संजय दुर्योधन, परमेश्वर मडावी यांनी आज पत्रकार परिषदेत संबंधित महा घोटाळ्यात सहभागी असलेल्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख अरविंद वानखेडे, जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व ज्या दलालामार्फत बोगस कागदपत्र बनवून प्रकल्पग्रस्तांना फसविण्यात आले अशा चा पडदा पास करावा व संबंधितांवर पोलिस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. बेरोजगारांना सिटी पीएस मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार करून खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. प्रकरणाचा काही तळा लावला गेला आहे. मार्च 2021 मध्ये 60 उमेदवारांपैकी 25 उमेदवार हे बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच 128 च्या यादीत 75 उमेदवार हे तज्ञ समितीद्वारा बोगस कागदपत्र करून गैरव्यवहार केला गेल्याचे आढळून आले आहे.
आमदार सुभाष धोटे यांनी बोगस सी टी पी एस मधील बोगस भरती संदर्भातील मागणी विधानसभेत लक्षवेधी सूचना म्हणून चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर मात्र संबंधित विभागात हालचाली सुरू झाल्या . हाच मुद्दा घेऊन इकडे आमदाराने विधान भवनात प्रश्न उचलून धरला होता. माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी मा. विशाल कुमार मेश्राम, व अन्न कर्मचाऱ्याच्या टिमने पडताळणी केली असता. माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे पत्र नुसार 60 पैकी 25, आणि 128 पैकी 75 उमेदवारांना खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळाल्याच्या कारणाखाली अपात्र ठरवले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सी टी पी एफ चे उप मुख्य महा व्यवस्थापक उलटा माझ्यावरच 25 कोटीचा मानहानीचा दावा केला. आता आम्ही केलेली तक्रार आणि त्या सिद्ध झालेले यानुसार वानखेडेवर मान आणि चादवा करणार आहोत असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
प्रथमदर्शी दुर्गापुर चे ठाणेदार धुळे साहेब यांनीही दुर्लक्ष केले. मात्र त्यांच्या निदर्शनास सत्य स्थिती आणून दिल्यानंतर त्यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये गणेश दिवसे, सचिन पाच भाई, विशाल देवतळे, भारत थेरे, जितेंद्र रायपुरे, जयवंत गणवीर, आकाश कासवटे, आणि गणेश केदार पवार यांच्यावर भादवि कलम 420, 468, 471, 511, आणि 34 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दलालाच्या मुख्य सूत्रधार गणेश दिवसे यांनी स्वतःची खोटे वारस दाखवून नोकरी मिळवली आहे. त्याने स्वतःच्या आईचा जन्म तारखेचा खोटा दाखला तयार केला होता.त्याची सत्य माहिती काटवल ग्रामपंचायत कडून मागवून घेतली.
एवढेच नाही तर या बोगस घोटाळ्यातील पुन्हा मोठे प्रकरण 594 लोकांना प्रशिक्षणार्थी नोकर म्हणून पंधरा हजाराच्या मासिक पगारावर सामावून घेतले आहेत. त्यांनाही आता पर्यंत सिटीपीएस कडून लाखोची पगारे देण्यात आली आहे. याप्रकरणाचा उलगडा लवकर होईल असे पत्रकार परिषदेत सांगितले असून. या संबंधित महा घोटाळ्यात सहभागी असणा-या संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू असे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे.