मुलाने जिवंत आईला 'मयत' दाखवून
बनावट सातबाराच्या आधारे शेतीवर लाखोंचे कर्ज उचलले
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे चिमूर तालुक्यातील मासळ येथील बैंक शाखा लिपिक अमर बापूराव रंदयी(रणदिवे) यांनी बनावट ७/१२ तयार आपल्याच आईला जिवंत असताना मयत दाखवून बनावट सातबाराच्या आधारे शेतीवर आपले नाव चढवुन लाखोंचे कर्ज उचलले.
अशिक्षीत असलेल्या स्वतःची आई श्रीमती मंजूळा बापुराव रंदयी(रणदिवे) यांच्या नावाने तब्बल 6 लाख 91हजारांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याने सदर फसवणूक करणाऱ्या मुलावर कारवाई करा व शेतजमिनीचा फेरफार रद्द करून न्याय मिळवून द्या अशी मागणी पिडीत आई मंजुळा बापूराव(रणदिवे) रंदयी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत त्यांचे मोठे चिरंजीव भाऊजी बापूराव रंदयी यांच्या माध्यमातून केली आहे.
अमर बापूराव रंदयी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा मासळ तालुका चिमूर इथे लिपीक या पदावर कार्यरत आहे व त्यांची आई श्रीमती मंजुळा रंदयी हिचे नावे असलेल्या सर्व्हे क्रमांक 141,147,139,140 या शेतजमिनिवर हिस्सेदारी त्यांचे भाऊ अनुक्रमे अशोक बापूराव रंदयी. भाऊजी बापूराव रंदयी, नानाजी बापूराव रंदयी, रेखा तानबाजी बारेकर, कल्पना रविकर नारनवरे इत्यादींची आहे. मात्र अमर बापूराव रंदयी यांनी आपल्या आईचा अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन वरील सर्व्हे क्रमांकाच्या शेतजमिनीवरून यांचे भाऊ भाऊजी बापूराव रंदयी व त्यांच्या बहिणी यांचे सातबारा वरून नाव हटवून आईच्या शेतजमिनीच्या हिस्सेदारीतून जाणीवपूर्वक वगळले आहे. दरम्यान त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतजमिनीवर त्यांनी तब्बल 691890 /- रुपये कर्ज विविध सहकारी संस्था शाखा खापरी मधून उचलले व नंतर त्याच शेतजमिनीच्या सातबारा मधून आईचे नाव हटवून पुन्हा अमर. नानाजी व अशोक यांचे नावे कर्ज उचलून प्रशासनाची फसवणूक केली.
या संदर्भात विविध सहकारी संस्था शाखा खापरीचे सचिव यांनी दिनांक २९/०७/२०२२ रोजी पुरविलेल्या कर्जबाकी संबंधीच्या दाखल्यामध्ये श्रीमती मंजुळा बाबुराव रंदयी, खापरी यांचेकडे रूपये ६९१८९०/- कर्ज बाकी असल्याचे दिसून येते. श्रीमती मंजुळाबाई यांच्या सांगण्यावरून त्यांनी कधीच कर्जाची उचल केलेली नाही. यावरून गैरअर्जदार यांनी आईच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन आईची फसवणूक केली आहे व मंडळ अधिकारी पटवारी यांना चिरीमिरी देऊन सातबारा वरून भाऊजी बापूराव रंदयी व आईचे नाव वरील सर्व्हे क्रमांक वरून गायब केले आहे शिवाय बहिणी रेखा तानबाजी बारेकर, कल्पना रविकर नारनवरे यांची सुद्धा आईच्या जमिनीवर असलेली हिस्सेदारी वगळून एक प्रकारे फसवणूक केली आहे. या प्रकरणात श्रीहरी राजेराम नन्नावरे यांनी पिडीत आई, भाऊ व बहिणींना मदत केली असता त्यानां विविध सहकारी संस्था शाखा खापरीचे सचिव अमर बापूराव रंदयी हे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे त्यामुळे या प्रकरणी त्वरीत दखल घेऊन अमर बापूराव रंदयी यांच्या शेतजमिनीच्या फेरफार व विविध कार्यकारी संस्था खापरी (धर्मु ) इथून उचल केलेल्या रकमेची चौकशी करून फेरफार रद्द करण्यात यावा व जुना सातबारा सुरू ठेवावा आणि अमर बापूराव रंदयी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत भाऊजी बापूराव रंदयी व आई मंजुळा यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती साहेब.सुधीरभाऊ मुनगंटीवार जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर
उपविभागीय अधिकारी साहेब चिमूर
अध्यक्ष चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक चंद्रपूर. तहसिलदार साहेब, चिमूर
सहायक निबंधक, सहकारी संस्था ता. चिमूर. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चिमूर यांच्याकडे दिल्या आहे. पत्रकार परिषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,भाऊजी रणदिवे . मंजुळा रणदिवे .श्रीहरी नन्नावरे रेखा बारेकर कल्पना नारनवरे इत्यादींची उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज