वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ.यशवंत घुमे अविरोध





वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ.यशवंत घुमे अविरोध

गोंडवाना विद्यापीठ निवडणूक

दिनचर्या न्युज :-
भद्रावती : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होऊ घातलेल्या वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत डॉ. यशवंत घुमे यांची अविरोध निवड झाली आहे. डॉ. घुमे हे मागील 26 वर्षापासून भद्रावती येथे कार्यरत असून यापूर्वीही दोनदा त्यांना या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.