मनपाच्या उदासीन पणाने भिवापूर वार्डात तीन चार दिवसापासून पाण्यासाठी बोंबाबोंब!





मनपाच्या उदासीन पणाने भिवापूर वार्डात तीन चार दिवसापासून पाण्यासाठी बोंबाबोंब!

नागरिकांनी पाण्याविना मरायचे का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. नागरिकांची पाण्यासाठी सर्वीकडे बोंबाबोंब सुरू आहे.
मागील तीन चार दिवसांपासून संततधार पावसामुळे सगळीकडे पावसाने हाहाकार केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. डायरिया, हागवन यासारखे साथीचे रोग पाण्यामुळे पसरतात.अशातच चंद्रपूर मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पिण्याच्या,पाण्यापासून वंचित ठेवला जात आहे. मागील तीन चार दिवसापासून पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. मनपातील  संबंधित अधिकाऱ्यांना  वार्डात पाणी का नाही येत यासंदर्भात विचारपूस केली असता   पळवा पळवी चे उत्तर देत असतात. तुमचा एकच वार्डात पाणी नाही का! असे उध्दड उत्तर देतात. 
या वॉर्डातील वायरमेन  याचा फोन नॉट रिचेबल दाखवले जाते. स्वतःला रुस्तम खान समजून नळाचे पाणी जसे काय याच्या घरची स्थिती लागली आहे .प्रकारचे अभियंत्यांसह  वॉलमनची मनमानी  सुरू आहे. मात्र याकडे महानगर  पालिकेचे आयुक्त प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत का ?आता असा प्रश्न आता नागरिकाना पडला आहे.. काही महिन्या अगोदर पालिकेतील राजकीय सत्ता संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण कार्यभार हा महानगरपालिकेच्या  प्रशासनाच्या अधिपत्याखाली चालू असून  सगळीकडे मनमानी कारभार सुरू आहे. आता तर चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांनी मरायचे का? असा प्रश्न  मनपा प्रशासनाला विचारला जात आहे.जर पाणी नाही मिळाले तर उधा मनपावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वार्डातील नागरिकांनी दिला आहे.