न्याय मिळेपर्यंत आजी-आजोबाचे आमरण उपोषण सुरूच राहील, अन्यायग्रस्त नातवाची आर्त हाक



न्याय मिळेपर्यंत आजी-आजोबाचे आमरण उपोषण सुरूच राहील, अन्यायग्रस्त नातवाची आर्त हाक


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील वृद्ध दाम्पत्य आमरण उपोषणाला आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी बसले आहेत. वृद्धदांपत्याचे नाव सौ. ताराबाई मारोती गोहणे, वय 70 वर्ष, श्री. मारोती लक्ष्मण गोहणे, वय ७५ वर्ष, रा. पळसगाव, तहः बल्लारपुर, जिल्हा चंद्रपुर येथील असून यांच्या घरी आश्रयहित म्हणून रोहीत आत्माराम वासाडे, पळसगाव, यांना एक रूम देण्यात आली होती. .दहा-बारा वर्षांपासून या जागेवर राहत असल्याने आम्ही वारंवार त्यांना खाली करण्यास सांगितले असता त्यांनी खाली केली नाही . असे करता करता त्यांनी या जागेवर स्वतःचा कब्जा करून घेतला.   त्या खोलीत किराणा दुकान टाकून स्वतःच्या मालकीचे असल्याचे सांगून

आम्हाला  म्हातारपणात  धक्काबुक्की करून दोघांनाही घराच्या बाहेर काढून दिले. व स्वतः घरात कब्जा करून बसला. वारंवार  तक्रार करूनही  कुणीही प्रशासनाने याकडे लक्ष दिले गेले नाही. म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज दिनांक 21/7/2021 पासून दोघेही  आमरण उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्हाला प्रशासन शासन न्याय देत नाही तोपर्यंत आमची जीवन  गेले तरी आम्ही इथून हटणार नाही .असा पवित्रा या वृद्ध दाम्पत्याच्या घेतला आहे.  अशी माहिती  यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित   वृद्ध दाम्पत्याचे नातूअमोल गूडपल्ले  ,  फ्रेंड   चारीट्री  ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू, मिनाक्षी करी, आरती आगलावे, अरविंद धिमाने, प्रमिला बावने, यावेळी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, या वृद्ध दाम्पत्याला  दोन दिवसात न्याय न मिळाल्यास. फ्रेंड  चाँरीटी  ग्रुपच्या वतीने  समर्थन जाहीर केले आहे. वेळ पडल्यास आम्हीही या दाम्पत्याला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. असे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देऊन  लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


सदर गाव बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात  येत असून या क्षेत्राचे आमदार सुधीर  मुनगंटीवार आहे.  या वृद्ध दाम्पत्याला योग्य न्याय  मिळेल का?  या  प्रकरणाकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी  जातीने लक्ष देऊन वृद्ध दाम्पत्याला   योग्य न्याय द्यावा अशी हाक जनतेतून होत आहे! 


मागील ४० ते ५० वर्षापासुन  पळसगाव येथे माती व कौलारू घरामध्ये वास्तव्यास आहे. अर्जदाराचे आज सदर मालमत्तेवर इंदिरा आवास योजने अंतर्गत २ स्लॅबचे पक्के मकानव १ मातीची खोली आहे. ज्याचा मालमत्ता क. ६२२ असा आहे. तीथेच अर्जदारांनी आपल्या मुलीचे शिक्षण व लग्नसमारंभ केलेले आहे. सदर मालमत्तेतील गाव नमुना ८. मालमत्ता कर आकारणी नोंदवही व टॅक्स पावती मध्येसुद्धा फक्त आणि फक्त अर्जदारांचेच नाव आहे. त्यांचे व्यतिरीक्त कुणाचेही नाव नमुद नाही. त्याप्रमाणे अर्जदार सदर वरील मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत..
अर्जदार राहात असलेले घर मोडकळीस आल्यामुळे वर्ष २००८-०९ मध्ये इंदिरा आवास योजने अंतर्गत अर्जदार यांना पर मंजुर झाले होते. त्या अंतर्गत अर्जदार यांना मिळालेल्या रक्कमेतून अर्जदारांनी नमुद ठिकाणी अंगमेहनतीने जमा केलेली स्वताजवळची रक्कम मिळवून जुन्या मातीच्या खोलीला मोडीत २ खोल्याच रेती, सिमेंट कॉफिट स्बचे पक्के ज्यात अर्जदारांना भविष्यात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सदर ठिकाणी किराणा दुकानाचा आज ना उद्या वापर करून आपला उदरनिर्वाह करतील या उद्देशाने खोली बांधण्यात आली.
दोघेही एकाच गावात राहात असल्यामुळे व एकमेकांना ओळखीत असुन त्यांचे गावकरी म्हणुन आपसात सलोख्याचे संबंध आहेत.  त्याचाच फायदा घेत,  त्याने आपले अस्तित्व गाजवून  जागेच्या मालमत्तेवर कब्जा केल्याचे  बुद्ध दाम्पत्याने सांगितले .माझे व माझ्या भावामध्ये बाचाबाची होवुन वाद निर्माण झाला आहे, आमचे दोघांचे पटत नाही आहे, त्यामुळे मला तिथे राहायचे नाही. तरी माझ्या परिवाराची आज रोजी काही एक व्यवस्था नसल्यामुळे मला तुमच्या घरकुलातील एका खोलीत काही दिवसाकरीता आश्रय द्यावा. मी माझी ताबडतोब व्यवस्था करतो व जेव्हा माझी सोय होईल तेव्हा मी निघुन जाईल, संकटसमयी गावकरी धावुन नाही येतील तर काय फायदा"   असे खोटे बोलून बोलुन व भावनिक रीत्या लाडी गोडी लावुन  आमच्याकडून इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधलेल्या घरात सोचुन समजुन, बुद्धिपरस्पर,  घरावर अतिक्रमण करण्याच्या ईराद्याने प्रवेश केला.  नात्याने व आपसी सलोख्याचे संबंध असल्यामुळे अर्जदारांना गैरअर्जदारांच्या संकट परिस्थितीत त्यांनी केलेली विनंती टाळणे बरे वाटले नाही.
यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत घरकुलातील उदरनिर्वाहाची समोरची १ रुमचे घरातील सामान कसेबसे दुसऱ्या खोलीत ठेवुन   माणुसकी या नात्याने देऊन  दिले. त्याचा गैर  फायदा  रोहित वासाडे यांनी घेतला.
आम्ही न्याय मागण्यासाठी  म्हणुन महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती, पळसगाव, अध्यक्ष, सरपंच, नियंत्रक, कोठारी पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणेदार साहेब पोलीस ठाणे कोठारी अर्थात पोलीस निरीक्षक साहेब, कोठारी, मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय बल्लारपुर, मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती बल्लारपुर, मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर, मा. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपुर या सर्व चंद्रपुर जिल्हयातील वरिष्ठ अधिकारीकडे धाव घेतली. परंतु कोणत्याही संबंधीत अधिकारीकडुन  आम्हाला आजपावेतो योग्य न्याय मिळाला नाही.म्हणून, न्यायास्तव मा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांचेसमोर आमरण उपोषणाला    बसण्यात आले असून न्याय  मिळेपर्यंत  उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या वृद्ध दांपत्याने घेतला आहे.