तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सन्माननिय व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन





तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सन्माननिय व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि.07:- चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ,तर्फे शैक्षणिक व क्रिडाक्षेत्रात सन 2021-22 मध्ये 10 वी उत्तीर्ण 90 टक्के, 12 वी सायन्स 85 टक्के कला,कॉमर्स 75 टक्के,पदविधर प्राप्त कला,व कॉमर्स,विधी व इतर 65 टक्के,सायन्स 75 टक्के,पदव्युत्तर सायन्स एम.एस.सी. 65 टक्के,सायन्स 75 टक्के, इंजिनियरींग पदविका 75 टक्के,डिप्लोमाधारक 75 टक्के, डी फार्म 75 टक्के,सी.ई.टी. व पी.एम.टी. 150 चे वर असणाऱ्या सन 2021-2022 च्या परिक्षेत चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार तसेच समाजात वावरणाऱ्या शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात ज्यांनी 2021-2022 मध्ये राज्यस्तरावर प्रविण्य व उत्कृष्ठ कामगिरी भुषविली असतील त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित केलेल्या व स्वत:च्या दोन पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर दिनांक 10 ऑगस्ट 2022, पर्यत रमेश भुते पठाणपूरा वार्ड चंद्रपूर, शैलजा भलमे,गंजवार्ड,चंद्रपूर, मनिष खनके,बालाजी वार्ड चंद्रपूर, उमेश आष्टनकर,व्यवस्थापक,संताजी वसतीगृह रेंजर,कॉलेजसमोर चंद्रपूर, प्रा.श्याम धोपटे,समाधी वार्ड,चंद्रपूर, मनोहर बेले,हनुमान नगर तुकूम चंद्रपूर,डॉ.के.बी.भरडकर,पठाणपूरा वार्ड,चंद्रपूर,प्रा.दुर्वास वाघमारे,विद्या विहार कॉन्व्हेंट छत्रपती नगर तुकूम,चंद्रपूर, सौ. मीनाक्षी ताई गुजरकर,जटपूरा वार्ड चंद्रपूर,सौ.चंदाताई वैरागडे,नेताजी चौक,पॅरामॉउट कॉन्हेंट जवळ,बाबुपेठ,चंद्रपूर, या ठिकाणी आपल्या संपूर्ण पत्यासह पाठवावे. सर्व वैद्यकीय व पदविका पी.एच.डी. धारक विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्हयातील असावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.वासुदेव गाडेगोणे यांनी केले आहे.