ओबीसींच्या हक्क न्यायाच्या मंडल आयोगाच्या जनजागृती करीता पुर्व विदर्भात निघणार मंडल आयोग जनजागृती यात्रा
दिनचर्या न्युज :-
नागपुर :-
नागपूर---मंडल आयोगाचे लाभ ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी विद्यार्थ्याना काय याबद्दलची माहिती या मंडल यात्रेतून देण्याचा मुख्य उद्देश आहे.सोबतच ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय समाजाच्या विकासासाटी पाहिजे तसा संख्येच्या प्रमाणात निधी मिळणार नाही हे पटवून देण्यात येणार आहे.
विदर्भातील सर्व ओबीसी,विजेएनटी समाजातील संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक आज रविवारला एमटीडीसी सभागृहात पार पडली.याबैठकीत07 ऑगस्ट *मंडल दिनानिमित्त* पहिल्यांदाच पुर्व विदर्भात मंडल जनजागृती यात्रा काढण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.ही मंडल जनजागृती यात्रा 1 ते 7 ऑगस्ट 2022, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या 7 जिल्ह्यात फिरणार आहे.
बैठकीत 01 ते 07 ऑगस्ट मंडल दिन उत्साहात साजरे करणे.
ओबीसी समाजातील विविध प्रश्न आणि उपायांवर चर्चा करणे.
ओबीसी समाजातील विद्यार्थी,युवक,अधिकारी, कर्मचारी यांना जोडणे.ओबीसींचे वसतीगृह ,महाज्योतीच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्याना मिळायला हवा.शिष्यवृत्तीचा लाभ ओबीसी आर्थिक विकास महामंडळ योजनाचा लाभ, मंडल आयोग लागू झाले त्यावेळी जनजागृतीसाटी काम करणारे कार्यकर्ते यांचा सत्कार करणे आदि विषयावरचर्चा करण्यात आली.बैटकीला बळीराज धोटे, दिनानाथ वाघमारे, ए.ए.डहाके
,उमेश कोरराम,अतुल खोब्रागडे, खेमेंद्र कटरे, गोपाल सेलोकर, पियुष आकरे,प्रतीक बावनकर,राहुल वाढई, देवेंद्र समर्थ,अर्चना कोट्टेवार, योगिता माचंमवार अश्विनी नागुलवार स्वाती अडेवार विनोद आकुलवार मुकुंद आडेवार ,प्रमोद काळबांधे, श्रावण फरकाडे ,नामदेव राऊत मनोज चव्हाण,डॉ.वैरागडे अशोक लंजे,कैलास भेलावे तिर्थराज उईके प्रेमलाल साटवणे, गोपाल सेलोकर सी.पी.बिसेन,पी.डी.चव्हाण सुनिल पटले दिपक पडोळे आदी स्टुडटंस राईट असो.,ओबीसी अधिकार मंच, ओबीसी सेवा संघ, ओबीसी संघर्ष समिती, भोयर पवार महासंघ, सविंधान शाखा,संघर्ष वाहिनी,सेल्प रिसपेक्टचे पदाधिकारी मोट्या संख्येत उपस्थित होते.
दिनचर्या न्युज