पुरात वाहून जात असलेल्या ऑटोतील लोकांना जवान निखिल काळे यांनी धाडस करून वाचवले सर्वांचे प्राण!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वरोरा तालुक्यातील टाकळी पान वडा या गावातील जाणाऱ्या नाल्यावर पाणी वाहत असताना हलगर्जीपणाने ऑटो चालकाने प्रवासी भरलेले वाहन वाहत्या पाण्यात टाकले. चंद्रपूर जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसाने सर्वीकडे नाल्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत अशातच. नाल्यातील पाण्याचा
प्रवाह जास्त असताना अलगत ऑटो नाल्यात वाहत जाऊ लागला. गावकऱ्यांच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता गावात एक महिन्यासाठी गांधीनगर येथून सुट्टीवर आलेल्या जवान निखिल काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन भर पावसात बचाव कार्य राबवले. याने दाखवलेला धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून पाण्यात वाहत जात असलेल्या 5 लोकांना वाचवण्यात यश मिळवले. वाहत जात असलेल्या सर्व लोकांनी ऑटोच्या टपावर आश्रय घेतला होता. त्यांना सुटका करण्यात यश मिळाले.
त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.