न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरू असताना सावली नगरपंचायच्या मुख्याधिकारीनी बांधकाम तोडण्याचे दिले नोटीस




न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरू असताना
सावली नगरपंचायच्या मुख्याधिकारीनी बांधकाम तोडण्याचे दिले नोटीस

न्यायप्रविष्ठ प्रकरणात नंदकिशोर निकुरे यांना बेकायदेशीर नोटीस. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- प्रतिनिधी :
नझुल च्या जागेवर असलेले कुठलेही बांधकामं हे तहसीलदार यांच्याकडे वैध की अवैध या संदर्भात कारवाई करिता असतें व त्या संदर्भात अतिक्रमण नियमित करण्याचा अधिकार हा सुद्धा तहसीलदार यांच्याकडेच असतो पण सावली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी नझुल च्या जागेवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत नंदकिशोर निकुरे यांच्या मालकीच्या सावली येथील सर्व्हे क्रमांक 131 मधील बांधकामाला अवैध ठरवले (ज्याबद्दल सावली दिवाणी न्यायालयात प्रकरण सुरु आहे) व ते बांधकाम तोडण्याच्या नोटीसा देऊन एकप्रकारे न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप व अडथळा निर्माण केला त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी नंदकिशोर यांच्या विनंती अर्जावरून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सावली नगरपंचायतच्या विकास कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा होत असताना व नगरपंचायतच्या कामकाजाचे ऑडिट सुद्धा झाले नसल्याच्या व मोठा घोळ होत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. अशा आपल्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या व न्यायालयीन प्रकरण असताना मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक अशाप्रकारे एखाया व्यक्तीस बेकायदेशीर नोटीस देऊन त्रास देणे कुठल्या कायद्यात आहे हे कळायला मार्ग नसून नंदकिशोर निकुरे हे साधेसुधे गृहस्थ असल्याने त्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन काही राजकीय एजंट मुख्याधिकारी यांना उलटसुलट सांगून भ्रमित तर करत नसावे? अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

मौजा सावली येथील सर्व्हे क्रमांक 131 मधील जवळपास 196.5 चौरस मिटर जागा ही नंदकिशोर निकुरे यांची असून त्याच्या शेजारी असणाऱ्या नझुल च्या जागेवर त्यांचे अंदाजे 30 वर्षांपूर्वी अतिक्रमण होते ती जागा सुद्धा नंदकिशोर निकुरे यांच्या सर्व्हे क्रमांक 131 मधीलच असल्याने त्यांनी त्या जागेवर बांधकाम सुरु केले. महत्वाची बाब म्हणजे ही जागा नझुल ची आहे त्यामुळे या प्रकरणात जर नंदकिशोर निकुरे यांनी अतिक्रमण केले असेल तर याबद्दल तहसील व नझुल प्रशासन ठरवेल की ही जागा नेमकी किती आहे व त्यात अतिक्रमन झाले की नाही पण सावली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी मनमानी करून सदर जागेवर अवैध बांधकाम असल्याचे ठरवले व नंदकिशोर निकुरे यांना नोटीसा देऊन अतिक्रमण व अवैध बांधकाम तोडण्याचे फर्मान काढले आहे. जेंव्हा की याच जागेचा वाद हा सावली दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या संदर्भात दिवाणी न्यायालयात असलेल्या प्रकरणाचा निपटारा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या जागेच्या संदर्भात कुठलाही नोटीस बजावू नये असा नियम आहे पण मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्ण नंदकिशोर निकुरे यांना नोटीस पाठवून अवैध बांधकाम पाडा अन्यथा नगरपंचायत ते बांधकाम पाडेल अशी तंबी दिली आहे ती पूर्णतः बेकायदेशीर व न्यायालयाचा अवमान करणारी असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सावली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार बघता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत राजू कुकडे,नंदकिशोर निकुरे,सुनिल कुडे,सुनिल काळबांधे,होमदेव तुम्बेवार,शंकर, यांची उपस्थिती होती.
तसे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसे तर्फे देण्यात आले आहे. शिवाय या निवेदनाच्या प्रती माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे देण्यात आले आहे.
दिनचर्या न्युज