शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी प्राधान्याने करावे रेन वॉटर हार्वेस्टींग - अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज,
सावित्रीबाई फुले प्रा. शाळा तुकुम यांना जलमित्र प्रमाणपत्र
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर - शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी सामाजिक कार्य म्हणुन रेन वॉटर हार्वेस्टींग प्राधान्याने करावे. याद्वारे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळुन रेन रेन वॉटर हार्वेस्टींग ही चळवळ होण्यास मदत मिळेल असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालीकेद्वारे शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था यांची रेन वॉटर हार्वेस्टींग संबंधी आढावा बैठक मंगळवार दि. २८ जुन राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली होती. शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यात सहभागी झाले होते.
शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात महानगरपालिकेमार्फत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे.
सर्व सहभागी शाळा महाविद्यालये यांनी आपल्या सर्व शिक्षकांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याची तसेच एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन जनजागृती करण्याची तयारी दर्शविली. याप्रसंगी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसविणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले प्रा. शाळा तुकुम यांना जलमित्र प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
दिनचर्या न्युज :-