दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने 21 जून 2022 ला जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस फुटबॉल ग्राउंड तुकुंम चंद्रपूर येथे सकाळी सहा ते आठ वाजता पर्यंत चालणा-या जागतीक योग्य दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन योग नृत्य महोत्सव परिवारातर्फे करण्यात येत आहे. योग नृत्य महोत्सवाचे आयोजक योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपुर, पोलीस दल, आरोग्य भारती, महावीर इंटरनॅशनल, चंद्रपूर अखिल भारतीय योग शिक्षक संघटना यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी चंद्रपूरकरांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवार सह उपस्थित राहण्याचे आवाहन आज आयोजित श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत योग नित्य परिवार ट्रस्टचे मुख्य आयोजक गोपाल मुंदडा यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत योग नृत्य परिवाराचे सदस्यही उपस्थित होते.
शरीर निरोगी राहण्यासाठी रोज तीस मिनिटे योग्य नुत्य करून शरीर परिपूर्ण निरोगी होत असल्याचे त्यांनी बरेच उदाहरण यावेळी करून दिले. एवढेच नाही तर प्रात्यक्षिकही सादर करून पत्रकारांना दाखविले. मानवी शरीरावर होणारा अनेक रोगांपासून मुक्ती मिळत असल्याने अनेकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवल्याचे उदाहरणे असून चंद्रपूर शहरातील सर्व वार्डात योग नृत्य निशुल्क शिबिर सुरू आहेत. जीवनात निरोगी असे जीवन जगायचे असेल तर आयुष्यातील आपला अर्धा तास योग्य नुत्य यासाठी द्यावा .