सिकॉम उपकेंद्राचा केबल जळाल्याने खंडित झालेला विजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणच्या अभियंता व कर्मचारी यांच्या शर्थीच्या प्रयत्नास यश या कठीण प्रसंगी केलेल्या सहकार्याबद्दल ग्राहकांचे आभार





सिकॉम उपकेंद्राचा केबल जळाल्याने खंडित झालेला विजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणच्या अभियंता व कर्मचारी यांच्या शर्थीच्या प्रयत्नास यश , या कठीण प्रसंगी केलेल्या सहकार्याबद्दल ग्राहकांचे आभार


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर 15.05.22 महावितरणच्या 33 किलो वोल्ट बबपुपेठ उपकेंद्राला विजपुरवठा करणारी सिकॉम मुख्य 33 किव्हो लाईन अतिभारीत होऊन त्याला शास्त्रीनगर जवळ रेल्वे लाईन क्रॉसिंग जवळ रात्री 02:015 वाजता जळून जाऊन मोठे छिद्र पडले, परिणामी बाबुपेठला उपकेंद्राला होणारा विजपुरवठा खंडित झाला. बाबूपेठ उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांना विजेपासून वंचित होण्यापासून वाचविण्यासाठी पठानपुरा उपकेंद्राच्या व्ही. के.2 वहिणीवर विजपूरवठा रात्री 02:30 वाजता वळविण्यात आला, परंतु आधीच अतिभारीत यंत्रणा त्यावर वाळविलेला भार (320अंपीअर च्या वर ) सहन न करून शकल्याने पठानपुरा व्ही. के. 2 वाहिनी चा जंपरही तापल्या मुळे रात्री 02:30 वाजता वितळून तुटला. त्यामुळं बाबुपेठ आणि पठानपुरा असा दोनही उपकेंद्रांचा विजपुरवठा खंडित झाला. रात्रभर दुरुस्ती काम करून,पहाटे 5 वाजता जेव्हा व्ही. के. 2 वाहिनी चे जंपर जोडून दोन्ही उपकेंद्र भारीत (चार्ज)करण्यात आले तेव्हा पठानपुरा उपकेंद्राचा विजपुरवठा सुरळीत झाला परंतु,बाबुपेठ उपकेंद्रावर वर भार जास्त   (320अंपीअर च्या वर )असल्याने, ट्रिप झाले. शेवटी बाबुपेठ उपकेंद्रावरून समाधी उपकेंद्राला होणारा विजपूरवठ्याचा भार कमी करण्यास समाधी उपकेंद्राचा काही भार  सकाळी 05:40  वाजता  नवीन समाधी उपकेंद्रावर वळविण्यात आला  आला.मुख्य अभियंता श्री सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे व कार्यकारी अभियंता उदय फारसखानेवाला यांनी लक्ष ठेवून अभियंत्याना मार्गदर्शन केले.            रात्रभर,  चंद्रपूर उपविभाग 1चे उपकार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहा. अभियंता साहिल टाके,  सहा. अभियंता टिकेश राऊत,सहा. अभियंता,  अभियंता सुमेध खणके,   सहा. अभियंता मिथुन मेश्राम  व ठेकेदार रवीभाऊ कातकर यांनी रात्रभर केलेल्या मशाकती मुळे शेवटी सकाळी 6 वाजता बाबुपेठ, भिवापूर वॉर्ड, लालपेठ, महाकाली वॉर्ड, पठानपुरा आदी ठिकाणचा विजपुरवठा पुर्ववत झाला. मात्र केबल  जोडणीचे काम भर उन्हात सकाळी 11 वाजता पूर्ण झाले.ग्राहकांना या कडक उन्हाच्या दिवसात रात्री विजपुरवठा खंडित झाल्याने उकाडा सहन करावा लागला. ग्राहकांनी या कठीण प्रसंगी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरण आभार व्यक्त करते.

दिनचर्या न्युज