अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर व लेखक ऍड . नितीन भावे यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार कलम,500,501,505,153A गुन्हा दाखल करा : बेबीताई उईके




अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर व लेखक ऍड . नितीन भावे यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार कलम,500,501,505,153A गुन्हा दाखल करा : बेबीताई उईके


चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष
देशाचे नेते आमचे सर्वांचे दैवत आदरणीय. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक वर पोस्ट टाकलेली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातुन आदरणीय. पवार साहेबांचा मोठ्या प्रमणावर अपमान केला असल्याचे दिसून येत आहे. त्याबरोबर अजुन एका गोष्टीचे जास्त वाईट वाटतं पोस्ट टाकत असतांना तिने सुरुवातीला "तुका म्हणे" म्हणून तुकाराम महाराजांचा सुद्धा अपमान केला आहे. सुरुवतीला हे वाक्य टाकून तिने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे देखील या ठिकाणी तिने अपमान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
केतकी चितळे सारख्या माथेफिरू व्यक्तीनी भविष्यात अश्या प्रकारच्या गोष्टी करु नहे या करीता तिच फेसबुक पेज , ट्विटर, इंस्टाग्राम सर्व अकाऊंट आपण कायमस्वरूपी ब्लॉक करावे तिच्याविरोधात व लेखक ऍड . नितीन भावे यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार कलम,500,501,505,153A अन्वये
भारतीय दंडसंहिता नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक. मा.अरविंद साळवे सर यांना निवेदन दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सबंधित पोलीस निरीक्षक रामनगर यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. मा. पोलिस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे केतकी चिथडे विरोधात कायदेशिर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हा उपाध्यक्ष ज्योति रंगारी जिल्हा सरचिटणीस पूजा सेरकी जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस रश्मी झोटिंग जिल्हा संघटक सरस्वती गावंडे जिल्हा सहसचिव शोभा घरडे जिल्हा संघटकसचिव नीलिमा नरवडे जिल्हासरचिटणीस निता मेश्राम जिल्हा सचिव नंदा शेरकी सुरेखा ठाकरे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

दिनचर्या न्युज