अखेर, सहा दिवसांनी "त्या"मृत महिलेची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेला यश





अखेर, सहा दिवसांनी "त्या"मृत महिलेची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेला यश


भद्रावती येथे मुंडके (शिर) नसलेल्या मृत महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना ओळख पटविण्यात आले यश...

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक ४ एप्रिल, २०२२ रोजी पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळे मागील पडीत शेत शिवारात अंदाजे २० ते २२ वर्षीय युवती मृतावस्थेत निर्वस्त्र स्थितीत मिळुन आली होती जिचे शरीराला मुंडके (शिर) नव्हते. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीचा खुन करुन तिची ओळख पटू नये म्हणुन तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करुन तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुद्ध अपराध क्रमांक १४१/२०२२ कलम ३०२, २०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवुन मृतदेहाचे व परिसराची पाहणी केली मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणुन तिचा शिर कापुन नेले तसेच कपडे सुध्दा काढुन घेवुन गेला. अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे सदर मृत महिलेची ओळख पटविणे पोलीसांना आव्हाण होते.
सदर या तरुणीचे आईवडील नातेवाईकसह भद्रावती मध्ये दाखल झाले आहे. चार दिवसांपर्यंत ना त्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली नाही. ना आरोपीचा सुराग लागला काल पाचव्या दिवशी ८ एप्रिलला त्या तरुणीची ओळख पटवीण्यात पोलिसांना यश आले आहे. निर्वस्त्र अवस्थेत मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वस्तूच्या माध्यमातून तसेच सदर तरुणीच्या हत्येच्या बातम्या प्रसारमाध्यमे प्रसारित झाल्याने आणि जिल्हा आंतरराष्ट्रातील पोलीस ठाण्यात माहिती देवुन ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला होते. या तरुणीवर सामुहिक अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भद्रावतीत आणुन टाकण्यात आल्याचा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत होता. काल त्या तरुणीची ओळख पटवीण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र स्थानिक पोलिसांनी या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. वर्तमान पत्रात व मिडियाच्या माध्यमातून माहिती नुसार तिच्या आईवडीलांना मिळाली असल्याचे सांगितले आहे. या तरुणीचे आईवडील भद्रावतीत दाखल झाल्यानंतर तिची ओळख पटली. सदर हि तरुणी नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील मन्सर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुणा, मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तु ईत्यादि शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातुन या वयाच्या हरवलेल्या / पळून गेलेल्या मुलींच्या शहानिशा केली परंतु उपयुक्त माहिती मिळुन आली नाही. घटना घडुन काही दिवस होवुन हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला त्यामध्ये पोलीसांना यश आले. गोपनिय माहितीदाराकडुन सदर महिलेचे ओळख पटविण्यात आली तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला त्यावरुन तिच्या राहते घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरुन तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधुन ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिचे बहीणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तु पाहुन मृत महिला ही तिची बहीण असल्याची खात्री केली.

सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेल चे विविध पथक मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत.

मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे सायबर एक्सपर्ट मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.