घुग्घुस एसीसी सिमेंट कंपनी मध्ये कंपोस्ट युक्त कोळसा मिश्रित भरलेला ट्रक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडला



घुग्घुस एसीसी सिमेंट कंपनी मध्ये कंपोस्ट युक्त कोळसा मिश्रित भरलेला ट्रक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडला

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- घुग्घुस येथील राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. दिलीप पिट्टलवार, श्री. सुरेश पाईकराव यांनी ACC घुग्गुसच्या ट्रक टर्मिनल मध्ये एक संशयास्पद ट्रक पकडला,ज्यामध्ये नागपूर महापालिकेच्या कंपोस्ट खत डेपो मधून नागपूर शहरातील कचरा कुंडी, नाल्यांमधून जमा केलेले प्लास्टिक, खराब जीर्ण कपडे, प्लास्टिकचे तुकडे, मुदत संपलेले औषधं, गोळ्या, टॅबलेट इत्यादींनी लबालब भरलेला जवळपास ३० टन घाणेरडा कचरा एसीसी सिमेंट कंपनीच्या बॉयलर मध्ये जळण्याकरिता आणला आहे. सिमेंट कंपन्यांचे बॉयलर हे कोळशावर आधारित, किंवा फरनेस ऑईल, किंवा लाईट डिझेल ऑईल, किंवा लाकूड यावर चालवायची परवानगी असताना, असल्या प्रकारे स्वस्त दरात कचरा मिळतो म्हणून असा कचरा बॉयलर मध्ये वापरून त्याच्या जळण्यातून जे काही विषारी धूर गॅसेस चंद्रपूर/घुग्गुसच्या परिसरात खुलेआम एसीसी सिमेंट कंपनीची मॅनेजमेंट करीत असेल तर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, या कचऱ्याच्या वापरामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार एसीसी सिमेंट कंपनीच्या व्यापस्थपणाने चालविला आहे. आणि हा प्रकार कित्तेक दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळेच देशातील प्रदूषित शहर म्हणून घुग्घूस बरोबर चंद्रपूर शहराची ओळख आहे.

असल्या प्रकारे कोळसा मिसरीत प्लास्टिक युक्त स्वस्त दरात कचरा मिळतो म्हणून असा कचरा बॉयलर मध्ये वापरून त्याच्या जळण्यातून जे काही विषारी धूर गॅसेस चंद्रपूर/घुग्गुसच्या परिसरात खुलेआम एसीसी सिमेंट कंपनीची मॅनेजमेंट करीत असेल तर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे,या कचऱ्याच्या वापरामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार एसीसी सिमेंट कंपनीच्या व्यापस्थपणाने चालविला आहे. आणि हा प्रकार कित्तेक दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळेच देशातील सर्वात प्रदूषित शहरामध्ये घुग्गुस पहिल्या स्थानावर आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार या ट्रकला पकडून पोलीस विभागास माहिती दिली. माझ्या लक्षात आणून दिल्यावर मी स्वतः महाराष्ट्र पदूषण विभागाचे अधिकारी श्री करे यांच्याशी संपर्क साधला, ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी स्थानिक जे अधिकारी चंद्रपूरला उपस्थित आहेत त्यांना संपूर्ण चौकशीचे आदेश दिले, घुग्गुस पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी श्री. पुस्तोडे यांच्याशी संपर्क केला असता, अजूनपर्यंत त्यांनी सादर ट्रक ताब्यात घेतलेला नाही. एसीसी सिमेंट कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्येच हे पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत, त्यामुळे ही टाळाटाळ सुरू असल्याचे दिसते, परंतु जर हे प्रकरण दडपण्याचा प्रकार प्रदूषण विभागाच्या आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तर ACC व पोलीस विभागविरुद्ध आंदोलन छेडल्या जाईल,

असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सांगितले.  या प्रकरणाची तक्रार मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री, प्रदूषण विभाग, तसेच मा. गृहमंत्री यांच्याकडे आम्ही उद्या करणार आहोत. कारण आधीच जिल्ह्यातील उकाड्यामुळे, आणि प्रचंड प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्याची जनता त्रस्त आहे, आणि त्यात बाहेरून आलेले अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील उद्योग मॅनेज करतात आणि त्यामुळे बाहेरून आलेले हे अधिकारी जिल्ह्यातील प्रदूषणाच्या विषयावर अजिबात गंभीर नाहीत. जिल्ह्यातील जनता गंभीर आजारी त्रस्त आहेत.