प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉकटरच्या उपचाराविणा महिलेचा मृत्यू





प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉकटरच्या उपचाराविणा महिलेचा मृत्यू
___________________________________
प्रा.आ.केंद्रात डॉक्टरसह कर्मचारी हजर नसल्याने गावकरी संतप्त.
___________________________________

दिनचर्या न्युज:-
भद्रावती –* तालुक्यातील पाणवडाळा येथील एका महिलेची अचानक तब्बेत बिघडल्याने तिला उपचारासाठी नातेवाईकांनी २ कि. मी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले असता येथील दवाखान्यात डॉक्टरसह कोणतेच कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराविना मृत्यू झाला.
पाणवडाळा येथील सिंधु भाऊराव हणुमंते ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. डॉक्टर सह एकही कर्मचारी दवाखान्यात उपस्थित नसल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती परीसरात पसरताच गावकऱ्यांची एकच गर्दी होवून संतप्त गावकऱ्यांनी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची यावेळी मागणी केली होती.
सदर या घटनेची माहिती भद्रावती पोलीसांना मिळताच पोलीस दाखल झाले. या घटनेची माहिती येथील डॉक्टर कातकर यांना माहिती होताच ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. रुग्णाची तपासणी करून रुग्ण मृत असल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार मृतकाची मुलगी कल्पना सुनील वाटेकर यांनी बघितला असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे डोंगरगाव खडी व पानवडाळा येथील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी करून येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मृतदेह या ठिकाणी ठेवला होता. घटनास्थळी भद्रावती पोलिस दाखल झाले असून संबंधित डॉक्टर व कर्मच्याऱ्यांनवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.