नागरकर यांच्यावर हल्ला करणा-यांना तात्काळ अटक करा
पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना निर्देश
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर: येथील नगरसेवक नंदू नगरकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना तात्काळ शोधून अटक करा, असे सक्त निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले.
नंदू नगरकर यांच्यावर हल्ल्याची माहिती होताच नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पोलिस अधीक्षकांना फोन केला. अशाप्रकारे लोकप्रतिनिधीवर झालेला हल्ला खपवून घेणार नाही. हल्याचे खरे सुत्रधार कोण हे तात्काळ पोलिसांनी शोधून काढावे. यामागे कितीही मोठा व्यक्ती असला तरी तो मोकाट सुटता कामा नये. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या मांडण्यासाठी असतात. राजकारणात मतभेद असले तरी एखाद्यावर जीवघेणा हल्ला करणे हे लोकशाहीला घातक आहे. यामागे असलेल्या अदृष्य शक्तीला पोलिसांनी गजाआड करावे. कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असेही ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पोलिसांना सुचना केल्या असून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थावर तातडीने चंद्रपूर येथे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठक आयोजित केली आहे