महात्मा जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, व्दारे वधु-वर परिचय मेळावा, धम्म मेळावा, संविधान परिषद चे आयोजन chandrapur




महात्मा जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, व्दारे
वधु-वर परिचय मेळावा, धम्म मेळावा, संविधान परिषद चे आयोजन

दिनचर्या न्युज 
चंद्रपूर :-
महात्मा जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर च्य विद्यमाने दिनांक 20 मार्च ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, चंद्रपुर येथे बहुजन मॅरेज ब्युरो अंतर्गत युवक-युवती परिचय मेळावा, धम्म मेळावा संविधान परिषद चे आयोजन केले आहे.

प्रथम सत्र : 20 मार्च 2022 रोज रविवारला सकाळी 10.00 वाजता युवक-युवतींची नावे नोंदर्ण 11.00 वाजता धम्म ध्वजारोहण व सामुहिक वंदना आणि युवक-युवती परिचय मेळाव्याचे उद्घाटन मा. डॉ. प्रमोद काटकर, प्राचार्य एस.पी. कॉलेज, चंद्रपूर यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी मा. गोकरण खोब्रागडे समितीचे कार्याध्यक्ष तर मान. कविता मडावी सामाजिक कार्यकर्त्या राजुरा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. युवक-युवती नोंदणी समितीच्या कार्यालयात चालू असून उपरोक्त कार्यक्रमास जास्तीत जास्त युवक-युवतींनी नोंदणी करुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आज श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव दिलीप वावरे, अशोक देवगडे, रमेश रामटेके, राजू खोब्रागडे, बंडू फुलझेले, यांची उपस्थिती होती. 
व्दितीय सत्र : धम्ममेळावा तथा संविधान परिषद चे आयोजन दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. आयु. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, विधानसभा क्षेत्र, चंद्रपुर व मुख्य मार्गदर्शक मा. आयु. ई. झेड. खोब्रागडे, (नि. सनदी अधिकारी) संस्थापक अध्यक्ष, संविधान फाऊंडेशन, नागपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. विजय उमरे, अध्यक्ष म. ज्यो. फुले तथा डॉ.बा.आं. वि.सं.स. चंद्रपुर आणि प्रमुख पाहुणे आयु. डॉ. विशाखा कांबळे, मराठी विभाग प्रमुख, मॉरीश कॉलेज, नागपूर, आयु अतुलकुमार खोब्रागडे, युवा सामाजिक कार्यकर्ता, नागपूर, आयु. धम्मानंद मनवर, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी चंद्रपुर जिल्ह्यातील बौध्द बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे पदाधिकारी राजु खोब्रागडे, दिलीप वावरे, अशोक देवगडे, बंडु फुलझेले, नरेंद्र बुरांडे व समितीचे इतर पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेद्वारे कळविलेले आहे.

दिनचर्या न्युज