समाजाचे प्रश्न व्यथा, संवेदना, यावर मार्ग निघण्यासाठी साहित्य संमेलन -डॉ. प्रदीप कदम





समाजाचे प्रश्न व्यथा, संवेदना, यावर मार्ग निघण्यासाठी साहित्य संमेलन -डॉ. प्रदीप कदम

दिनचर्या न्युज :-
शेगाव :-
विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघाच्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिनांक 12 मार्च 2022 ला विघ्नहर्ता हॉल, वीर भाई कोतवाल नगरीत मा. कॅप्टन महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. प्रदीप कदम हे होते. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी 'आता जबाबदारी आपली सर्वांचीच ' असे विचार मांडून,आपल्याकडील अध्यक्षपदाचे सूत्रे प्राध्यापक डाँ. कदम यांच्याकडे दिली.
मंचावर उपस्थित स्वागत अध्यक्ष अँड. विलास वखरे, संघाचे अध्यक्ष शरदजी ढोबळे , सुनिता वरणकर, यांची मंचावर उपस्थिती होती. साहित्य संमेलनाचे प्रस्तावना मांडताना प्राध्यापक ढोबळे सर म्हणाले की , या साहित्य संमेलनातून नाभिक समाज प्रबोधनाची ज्योत सतत तेवत राहो! नाभिक समाजातील दुर्लक्षित असलेल्या शेवटच्या समाज बांधवांचे प्रबोधन आणि त्यातून प्रगती होणे हेच आपले अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट असले पाहिजेत. असा हा छोटासा प्रयत्न केला आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचे सत्कार यावेळी करण्यात आले. तेजस्विनी महिला ग्रुप च्या वतीने सुनिता वरणकर त्यांचा सत्कार करण्यात आला.
या साहित्य संमेलनात नव युवकांना लाजवेल अशा 80 वर्षाच्या आजी सौ गुलाब सैदव पवार, युट्युब सोशल मीडियावर गाजत असलेल्या  'बिंदास मुलगी गौरी' यांचाही या वेळेस सत्कार  करण्यात आला.
उद्घाटन या भाषणात बोलताना  डॉक्टर गायकवाड म्हणाले,  महाराष्ट्राची भूमी साधुसंतांची म्हणून ओळखले जाते,वीरभाई कोतवाल नगरी मध्ये होणारे साहित्य संमेलन हे समाजाची अस्मिता जागी करणारे साहित्य असेल, माणूस माणसाला ओळखयला लागेल तेव्हा खरी निशांत होईल!    संघटनेला  फलरूप झाले असे वाटेल. साहित्य संमेलन उद्याच्या पिढीला  बळ देणारी वाटचाल राहील.  समाज आणि साहित्य याची सांगड  घालावी लागेल.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रदीप कदम म्हणाले, साहित्य संमेलन हे समाज परिवर्तनासाठी आवड असणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील नागरिक बांधवांनी साहित्याच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजाबाबत निवडक आणि समस्या परिवर्तन  घडवून आणण्यासाठी. नाभिक समाजाचा वारसा, समाजातील विविध समस्या, संघटनेचा अभाव, समाज विकासासाठी पर्याय, यूवकां बरोबर  पालकांचे प्रबोधन व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या  वेदना सांगायची गरज नसून, समाजातील मूलभूत वेदनांचा गाभा शोधणे आजच्या समाजाला काळाची गरज आहे.    गर्दी नको, परंतु वैचारिक माणूस पाहिजे,  चळवळीचा  युवक पाहिजे त्यांना घडवण्याची गरज आज समाजाला आहे. बुद्धिजीवी माणसाची गरज समाजाला आहे. शिक्षण  प्रेरणेची गरज आहे.  कुठलीही  कुबडी आधार  नसताना पुढे  जावं असं समाज नाही! समाजाचे प्रश्न व्यथा, संवेदना यावर मार्ग निघण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज. 
या सर्व माध्यमावर  साहित्य संमेलनातून आपले  संमेलनाध्यक्षीय   परखड मत मांडले.
 दुसऱ्या सत्रात  'नाभीकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारला जाव्यात' यावर डॉ. यशवंत घुमे मार्गदर्शन केले.
 साहित्यक्षेत्रात कथाकथन,  कवी संमेलन  , हास्य जत्रा,  साहित्य संमेलनामध्ये काही  ठरावही पुढील दिशादर्शनासाठी पारित करण्यात आले. 
केशाशल्पी महामंडळाच्या अध्यक्षांची निवड जाहिर करून निधिची तरतुद करणे.
कोरोना काळात आत्महत्या केलेल्या नाशिक बांधू वांच्या कुटुंबियांना मदतनिधी दयावी/ जाहिर करावी.  जीवा महाला यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्द करणे पारडी येथील संत नगाजी महाराज मंदिराला पर्यटन श्रेणीत समावेश करून विकास करणे संत सेनाजी महाराज / संत नगाजी महाराज यांचे | साहित्य संकलित करून राज्य सरकारने गाथा स्वरुपात प्रकाशित करावे, अनुदान दयावे.
वीरभाऊ कोतवाल हुतात्मा साहू, वाघ, जिवामताला यांच्या जीवनचरित्रावर आधारित पाठांचा समावेश शालेय पाठ्य पुस्तकात करावा नाभिक साहित्य संमेलनाला राज्य शासनाने अनुदान दयावे. नाभिक समाजातील सलुन कारागीरांना प्रोत्साहन मिळावे कौशल्य विकसित व्हावे यासाठी कार्यशाळांना शासनाने अनुदान दयावे.(OBC) समाजाच्या जनगणनेत नाभिक समाजाची लोकसंख्या स्पष्ट करून सामाजिक कल्याणासाठी शासनाने योजना राबविणे.
- उच्चपदस्थ राजकीय मंडळीकडून नाभिक समाजाच्या नावाने हिन व विभत्स प्रकार उल्लेख करून सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते अशा प्रकारांना आन घालण्यासाठी शासकीय स्तरावरन त्वरेने कार्यवाही करुन FIR दाखल करावे.अशा प्रकारे ठराव पारित करण्यात आले. 
महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या नाभिक बांधवांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती . 
अशा विविध पैलू ने महाराष्ट्र नाभिक साहित्य  कलादर्पण संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य संमेलनाची  राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी अतकरेआणि अशोक कुबडे 
आभार अविनाश बेलाडकर  यांनी केले. 
 या कार्यक्रमाचे   यशस्वी साठी शेगाव वासियांनी अहोरात्र मेहनत घेऊन संमेलन यशस्वी केले.