अखेर पोलीसांनी राजूरा - गडचांदूर मार्गावरील कोळसा तस्करांच्या आवडल्या मुसक्या!




अखेर पोलीसांनी राजूरा - गडचांदूर मार्गावरील कोळसा तस्करांच्या आवडल्या मुसक्या!

8 लाख 90 हजाराच्या मुद्दे मालासह आरोपीना अटक!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-
राजूरा परिक्षेत्रातील कोळसा खानीतून निघणारा कोळसा हा ट्रक द्वारे सिमेंट कंपण्याना पुरवल्या जातो.याच ट्रक मधून अवैद्य, ओव्हरलोड, ट्रकच्या कैबिन मध्ये कोळसा भरल्या जात असतो .हा कोळसा राजुरा गडचांदूर मार्गावर ट्रक ड्रायव्हरला थोगडीक लालच देवुन उतरवला जातो. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू असून या अवैद्य कोळशाच्या धंद्यात अनेक कोळसा तस्कर गूंतले असल्या च्या बातम्या वारंवार प्रकाशित होत असताना मात्र अखेर मंगळवारला या कोळसा तस्कराच्यां राजुरा पोलिसांनी  मुसक्या आवळल्या.
  या कोळशाची गडचांदूर मार्गाने सिमेंट कारखान्यात वाहतूक केली जाते आणि याच ट्रकमधून कोळसा उतरविला जातो. सध्या या वर्दळीच्या राज्य मार्गावर असलेल्या कापणगावपासून ते हरदोना गावापर्यंतच्या मार्गात अनेक कोळशाचे स्टॉक पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्टॉकवर जमा झालेला कोळसा खुल्या बाजारात वाढीव किमतीत विकल्या जात आहे. आजघडीला बहुतेक स्टॉकवर मोठ्या प्रमाणात कोळसा जमा होत असल्याची माहिती आहे. याच मार्गावरच्या हरदोना गावलागतच्या शेतात कोळशाचा मोठा स्टॉक असल्याचे दिसून येत आहे.
राजुरा पोलिसांना राजुरा ते गडचांदुर रोडवर मौजा आर्वी गावाजवळील जिनींगच्या बाजुला एका शेतात ट्रक मध्ये चोरीचा कोळसा भरत असल्याची गृप्त माहिती मिळाली. मंगळवारला एक वाजताच्या दरम्यान माहितीप्रमाणे एक ट्रक  पोलिसाना दिसला. त्यात चोरीचाकोळसा भरताना चार आरोपी ताब्यात घेण्यात आले.   मुद्देमाल जप्त करण्यात राजूरा पोलीसाना यश आले.
त्यात दगडी कोळसा भरुन असलेला दिसला पोलिसांनी ट्रकच्या कॅबिन मध्ये बसलेल्या इसमांना सदर कोळशाचे पास, परवाना, बिल बद्दल विचारले असता कँबिन मध्ये बसलेल्या इसमांनी कोणतेही कागदपत्र न दाखवता उडवाउडवीचे उत्तर दिले यावरुन सदर माल हा चोरीचा दाट संशय आला.
यावरुन सदर माल हा चोरीचा दाट संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी असता 33 टन 50 किग्रॅ. दगडी कोळसा अंदाजे किमंत 90 हजार व ट्रक क्र. AP-07 TF-7489 किमंत अंदाजे 8 लाख असा 8 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ट्रक चालक मोहमद अब्दुल मुजीम अब्दुल गफार वय 40 रा. अंकुशपुर, जि. भुपालापेल्ली तेलंगना, बलदेव सिंग रजवेन्द सिंग शेरगील उर्फ लल्ली वय 27, शेख वाजीद शेख बाशिद वय 40, जैयनुद्दीन सिराज सैय्यद वय 22 • तिन्ही रा. सोमनाथपुरा राजुरा यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई सपोनि पी. आर. साखरे यांनी केली. पोलिसांनी भादवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील कारवाई उपविभायीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि झुरमुझे करीत आहे.