सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित ५ महाविद्यालयांचा सयुक्तरित्या २८ डिसेंबरला
गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा...
कुलगुरू डॉ. बोकारे यांच्या हस्ते ९४ विद्यार्थ्यांना पदवी वितरण व पुरस्कृत केले जाणार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
२६ डिसेंबर सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालयासह इतर ५ महाविद्यालयातील एकूण ९४ विद्यार्थी यंदा गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या सर्व विद्यार्थ्याचा गौरव सोहळा येथील सरदार पटेल महाविद्यालयात येत्या २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त या विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे या राहणार आहेत.
सर्वोदय शिक्षण मंडळ हे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री दिवंगत शांताराम पोटदुखे यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्याच पावलावर आता सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने गुणात्मक दर्जा प्राप्त केला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत या मंडळाद्वारे संचालित एकूण पाच महाविद्यालयातून ९३ विद्यार्थी यंदा गुणवत्ता झळकले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घसघशीत यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पदवी वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन सर्वोदय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातद्वारे संयुक्तरीत्या करण्यात आले आहे. या समारंभात विविध विषयात प्रावीण्य मिळविणाऱ्या व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविले जाणार आहे.
सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित ५ महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या---
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर - ६२, शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालय चंद्रपुर- १९, लीना किशोर मामीडवार व्यवस्थापन महाविद्यालय, चंद्रपूर-०७, सुशिला रामचंद्र मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर - ०४
शंकरराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी ०२, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण 65 विध्यार्थी सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित ५ महाविद्यालये विध्यार्थी हे गोल्ड मेडल प्राप्त झाले आहेत.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांतभाऊ पोटदुखे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सरदार पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सदर सोहळा सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात होणार आहे. या समारंभात विविध विषयात प्रावीण्य मिळविणाऱ्या व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याना महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ यांच्या विद्यमाने पुरस्कृत करण्यात येणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत माजी प्राचार्य, कुलगुरू डॉ. दिक्षित, तसेच सर्र्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित ५ महाविद्यालयांतील प्राचार्य यांची उपस्थिती होती.