चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये, उर्जानगर वसाहती मधील वाघ व बिबट यांचा बंदोबस्त करा - पंकज ढेंगारे
अन्यता
तिव्र आंदोलन करण्याचा इशारा!
तिन बछडास वाघीणीचे वास्तव!
मोठी दुर्घटना होण्याची वनविभाग पाहात आहे का वाट!
वावर असल्याने त्यांना जेरबंद करण्याची उपाययोजना करून वनविभागाची चौकी तात्काळ
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये चंद्रपूर नव्हे तर अख्या महाराष्ट्राला विद्युत महा औष्णीक विद्युत केंद्र ऊर्जानगर येथे अस्तित्वात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी नागपूर रोड वरून जाणारा रिंग रोड वसाहतीत जातो. या ठिकाणी दोन्ही बाजूला नाले असून जंगल व्याप्त असल्यामुळे वाघांचे अस्तित्व असतो. या भागात ऊर्जानगर वसाहातकालनी व आजूबाजूला अनेक गाव वस्त्या असून ताडोबाला लागून जंगलाचे परिसर असल्यामुळे या भागात वाघाचे व बिबट्यांचे,आस्वल, तसेच हिस्त्रपशूचे वास्तव्य आहे. नेहमीच्या भागामध्ये वाघाचे हल्ले होत असतात. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र वन विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभाग कुठलीही दखल घेताना दिसून येत नाही. येत्या काही दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर या परिसरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे , ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंन्नाडे, ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, शुभम आबोदकर, सौरभ घोरपडे, अभिनव देशपांडे, ऋषभ घाटे, अभिजीत मडावी, सौरभ घाटे, भाग्यवान झोडे, पवन मेश्राम, यांची उपस्थिती होती.
आशिया खंडातील सर्वात मोठा महाऔष्णीक विद्युत केंद्र, चंद्रपूर उर्जानगर येथील परीसरात वाघ व बिबट यांचा नियीमत वावर असल्याने काल दिनांक ०२/१२/२०२१ रोजी सांयकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान निष्पाप नागरीकावर वाघाने हल्ला केल्याने अशा प्रकारच्या घटना वारंवार घटना होत असल्यामुळे या अगोदर उर्जानगर परीसरामध्ये बिबटयाच्या हल्यामध्ये एका पाच वर्षाच्य मुलीच्या बिबट हल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना होत असल्यामुळे महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये चंद्रपूर उर्जानगर वसाहती मधील वाघ व बिबट यांचा वावर असल्याने त्यांना जेरबंद करण्याची उपाययोजना करून वनविभागाची चौकी तात्काळ देण्यात यावी.
उर्जानगर वसाहतीत ये-जा करणारे कर्मचारी व ईतर रहदारी करणारे नागरीक सुरक्षीत नसल्यामु नेहमी दशहती असतात. त्यामुळे सदर बाबीवर गांर्भीयपुर्ण विचार करण्यात यावा अन्यथा यापुढे प्राण हिंसेच्या घटना घडल्या तर आपल्या विभागाला जबाबदार धरण्यात येईल.
तरी सदर उपरोक्त बाबीचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला.