तृतीयपंथीयांना रोजगार मिळावा या साठी तहसीलदार यांना निवेदन





तृतीयपंथीयांना रोजगार मिळावा या साठी तहसीलदार यांना निवेदन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
संपूर्ण देशासह राज्यात कोरोना महामारी मुळे अनेकांचे रोजगार संपले. मागील दोन वर्षांपासून तृतीयपंथी यांची ज्याच्यावर रोजी रोटी मिळायची ती रेल्वे बंद होती. दोन वर्षांनी ती सुरू झाली असली तरी आता तृतीयपंथीयांना याचा उधरनिरवाह होत नसल्याने आता रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून जिल्हातील तृतीयपंथीयांनी संबोधन ट्रस्ट चंद्रपूर वतीने तहसीलदार निलेश गौंड यांना तृतीयपंथी यांच्या उदरनिर्वाहासाठी कुठेतरी काम उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संबोधित ट्रस्टचे अध्यक्ष राज कचोडे, आरती गंगोत्री, पप्पू गंगोत्री, पलक दुपात्रे, कांचन थापा, प्रवीण, यांनी केले आहे.