दिनचर्या न्युज
चंद्रपूर - चिमूर :-
आज सकाळी वनपरिक्षेत्रातील कोलारा गेटवर कर्तव्यावर असलेल्या महिला वनरक्षका वाघाने उचलून नेल्याची घटना घडली आहे. या महिला वनरक्षकाचे नाव ढोमणे असल्याची चर्चा सुरू आहे. या गेटवरून अनेकांना ताडोबा येथील वाघ पहाण्यासाठी कोलारा गेट वरून भ्रम करण्यासाठी जाव लागत. या गेटवर वनरक्षक यांना तैनात करण्यात येते. या भागात वाघांचा जास्त वावर असून अनेक पर्यटक देश विदेशातून याच गेटवरून ताडोबात भ्रम करतात.
आज कर्तव्यावर असणाऱ्या महिला वनरक्षकास वाघाने उचलून नेले असून त्या महिला कर्मचाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे सांगितले जात आहे.