जिल्ह्यातील सात उपकेंद्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण
महावितरणद्वारा विविध योजणांतर्गत ग्राहकांसाठी उभारण्यात आलेल्या उपकेंद्राचे ऊर्जामंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मा. ना. ना.नितीन राऊत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या परिमंडळ कार्यालयात उपकेंद्र लोकार्पण सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात महावितरणच्या व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निर्माण पूर्ण झालेल्या उपकेंद्रांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील मंडळांतर्गत निर्मित ३३किव्हो - राजूरा तालुक्यातील अहेरी व देवाडा उपकेंद्र, सावली तालुक्यातील हरंबा, मुल तालुक्यातील मुल एमआयडीसी या दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमधून निर्मित, चंद्रपूर तालुक्यातील सिदूर या पूर्व विदर्भ विकास योजनेमधून निर्मित तर नेरीखांबाडा या वरोरा तालुक्यामधील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून तसेच चंद्रपूर मधील समाधीवार्ड उपकेंद्राचे एकात्मिक उर्जा विकास या योजनेमधून निर्मित अशा विविध योजनांतून निर्मित एकूण ७ उपकेंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आभासी माध्यमातून करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयात ग्राहकांना शास्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच तर एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत १५४ कोटी ९१ लाख खर्चून या उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व विदर्भ विकास योजनेतून ३ कोटी ७ लाख तर उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून २ कोटी ३० लाख खर्च करुन या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत आज चंद्रपूरात विविध उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत म्हणाले की, कृषी धोरण शेतकऱ्यांसाठी नेहमीच करण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कृषी पंप विज धोरण 2020 अंतर्गत 0 ते 30 मीटर पर्यंतच्या 1398 जोडण्या प्रलंबित केल्या होत्या त्यापैकी 1296 वीज जोडण्या आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या बी जोडण्यांची संख्या 5584 एवढी आहे. त्यापैकी 1522 जोड्या देण्यात आलेले आहेत. उर्वरित ग्राहकांना दिल्या जातील आणि त्यांच्या अडचणी याठिकाणी दूर केल्या जातील . ए वन पंप योजना अंतर्गत या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केलेले आहे त्यासाठी जिल्ह्यात 4401 प्रस्तावात पैकी 3347 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ग्रुप टॉप सोलर अंतर्गत 1157 दिला त्यांना लाभ देण्यात आलेला आहे .जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी उभारली आहेत या सबस्टेशन मध्ये जवळपास 70 ते 75 हजार ग्राहकांना चांगली विज पुरवले जाणार आहे. त्याची सेवा मिळणार आहे. आपणा सर्वांना माहितच आहे की, विद्युत कंपन्याची आर्थिक स्थिती ठीक नाही तरीही विकासा बद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही . असेही ते म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची संख्या भरपूर असून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्युत ही दिवसा उपलब्ध करून द्यावी, चंद्रपूर जिल्हा विद्युत उत्पादक जिल्हा असून तिथे देशातील सर्वात मोठे विद्युत केंद्र थर्मल पावर असून यातून निघणारे प्रदूषण जिल्ह्यासाठी घातक असून इतर ठिकाणच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याला दोनशे युनिट विद्युत मोफत द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अन्यथा चंद्रपूर करांना रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी लढावे लागेल असेही किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार जिल्ह्यात प्रदूषणा बरोबरच इतर क्षेत्राचाही विचार करून जिल्ह्यात वीज उपलब्ध कडून शेतकऱ्यांना तीन तीन दिवसांनी शेतीला विद्युत पंप चालेल अशा प्रकारची विद्युत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. राजुरा चे आमदार सुभाष धोटे म्हणाले, जे नियमित विद्युत बिल भरतात परंतु काही भरत नाहीत त्यामुळे भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो असा कुठलाही दुजाभाव न करता सरसकट जे शेतकरी कृषी पंपाचे विद्युत भरतात त्यांना विद्युत पुरवठा करण्याची मागणी यावेळी केली.
सदर समारंभाला प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. विजय वडेटटीवार, उर्जाराज्यमंत्री ना. नितीन राऊत, , जिल्हा परिषद चंद्रपूर अध्यक्ष श्रीमती. संध्याताई गुरनुले, विशेष अतिथी म्हणून खासदार श्री.सुरेशभाउु धानोरकर, , श्री.सुभाष धोटे, श्रीमती. प्रतिभाताई धानोरकर, श्री.किशोर जोरगेवार, तर सन्माननिय अतिथी म्हणून प्रधान सचिव उर्जा दिेनेश वाघमारे, मा.श्री.विजय सिंघल (भा.प्र.से), अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण, मा. श्री. अजय गुल्हाने (भा.प्र.से) जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मा. डॉ. मिताली सेठी (भा.प्र.से), मुख्य् कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर मा. श्री. संजय ताकसांडे, संचालक (संचलन) महावितरण, मा. श्री. सतिश चव्हाण संचालक (वाणिज्य्) महावितरण, मा. श्री. रविंद्र सावंत संचालक (वित्त्), महावितरण मा. श्री. भालचंद्र खंडाईत संचालक (प्रकल्प्ा/मासं), महावितरण, श्री. प्रसाद रेशमे कार्यकारी संचालक (प्रकल्प्), महावितरण, मा. श्री. अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (वितरण) महावितरण, मा. श्री. सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक, महावितरण, नागपूर,
काय्रक्रमाचे विनीत म्हणून मा. श्री. सुनिल देशपांडे मुख्य् अभियंता, चंद्रपूर परिमंडळ, महावितरण, मा. श्रीमती संध्या चिवंडे अधिक्षक अभियंता, महावितरण (चंद्रपूर मंडळ) मा. श्री. सुहास मेत्रे अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) महावितरण, राकेश जनबंधु अधिक्षक अभियंता (स्थापत्य), महावितरण, नागपूर यांची उपस्थिती होती. तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.