चंद्रपूर
अडीच हजारासाठी लिपिक एसीबीच्या जाळ्यात!
कोरपणा तहसील कार्यालयात लिपीकास रंगेहाथ अटक!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-कोरपणा
येथील तहसील कार्यालयातील एका लिपिक व खासगी इसमाला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दि.२६ ला दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. मौजा वनोजा येथील वर्ग दोन चे शेत वर्ग एक करण्याकरता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी लाच मागितली होती. तक्रारदार कडे लाचेचे केलेल्या पडताळणी कारवाई वरून मंगळवारी सापळा रचून कारवाईदरम्यान अव्वल कारकून विलास ठमके यांनी केलेल्या मागणीवरून खाजगी इसम प्रदीप आदे यांचे मार्फतीने ठमके याचे करिता लाच रक्कम म्हणून स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना तहसिल कार्यालय कोरपना येथील आवारात पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेतृत्वात ना पो का संतोष येलपुल वार, रवींद्रकुमार ढेगळे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यानी केली.