सिध्दबलीचे पूर्व कामगार व व्यवस्थापनाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न, पूर्व कामगारांना कामावर घेण्याचे कंपनीव्दारे मान्य-पूर्व केंद्रीय गृहराज्यमत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराचे फलीत
दिनचर्या न्युज
चंद्रपूर:- सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगार, प्रकल्पग्रस्त, गावातील बेरोजगार आणि उद्योगातून होणारे प्रदुषण यावर जिल्हाधिकारी यांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी बैठक घेण्यास सुचित केले होते. त्यानुसार दि. 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार नेते, पूर्व कामगार, सरपंच व प्रकल्पग्रस्तांसोबत कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस अतिरीक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, कामगारांचे प्रतीनिधी, लेबर कमीशनर, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, प्रदुषण नियंत्राण मंडळाचे अधिकारी, जिल्हा उद्योग सुरक्षा व स्वास्थ्य विभागाचे (दिशा), पी.एफ चे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचे अंतीम देय देवून कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले. मा. जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्व कामगारांना पुरावे सादर करण्याच्या सुचना करीत कंपनी व्यवस्थापनास आदेश दिले की, त्यांना कंपनीच्या रोलवर सामावून घ्यावे.
सदर बैठक अत्यंत फलदायी ठरल्याने व बैठकीमध्ये पूर्व कामगारांबाबत अतिशय चांगला निर्णय झाल्यामुळे संबंधीत कामगारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. या बाबत मा. जिल्हाधिकारी व कंपनी व्यवस्थापनाचे कामगारांनी आभार मानले. सदर बैठकीस कामगारांच्या वतीने अॅड. प्रशांत घरोटे, कामगार नेते उत्तम आमडे, विजय आगरे, विनोद खेवले, प्रदीप वासाडे, कीशोर ठावरी, रमेश सोनटक्के, वारलु वरवडे, विशाल आत्राम, सत्यपाल खेवलेे, श्रीमती रोगे ताई, येरूरचे सरपंच आमटे, दिलीप शास्त्राकार व अन्य कामगार उपस्थित होते.