गोंदिया चांदाफोर्ट - बल्लारशा मेमु रेल्वे गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल! नागभीड जंक्शनवर स्वागत!




गोंदिया चांदाफोर्ट - बल्लारशा मेमु रेल्वे गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल! नागभीड जंक्शनवर स्वागत!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
तब्बल दीड वर्षानंतर सुरु झालेल्या गोंदिया- नागभीड-बल्लारशा पॅसेंजर मेमु रेल्वे गाडीचे नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशन वर उत्साहात स्वागत करण्यात आले.
  कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासुन रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. आज २८ सप्टेंबरला पुर्ववत नागभीड स्टेशन वर ही गाडी येताच दक्षिण पुर्व मध्य रेल्वे बिलासपुर झोन चे सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी रेल्वे ड्रायव्हर एम.एम.पराते यांचे स्वागत केले. यावेळी आर.पी.एफ.नागभीड चौकी चे शर्मा , रेल्वे संघटनेचे पदाधिकारी ,आटो संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार व प्रवासी यांची उपस्थिती होती. 
              सध्या या मार्गावर ही एकच पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेचे प्रवासी भाडे सध्या मेल व एक्सप्रेस गाडीचे आकारण्यात आलेले असल्याने यावेळी प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर दिसुन आला. तरीही रेल्वे प्रवाशांनी ही गाडी सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत लवकरच अधिकच्या फेरी सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी आटोचालक , गाडीमधे सेवा देणारे चहा विक्रेते , फळ व दैनिक वर्तमानपत्र तसेच इतर विक्री करणारे विक्रेते यांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दिनचर्या न्युज