विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विरोधात गुन्हा दाखल करा :बेबीताई उईके






विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विरोधात गुन्हा दाखल करा :बेबीताई उईके

राष्ट्रवादी महिला काँगेसची रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-पुणे जिल्हातील शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्य आयोजित एका कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे वक्तव्य केले .असून याबाबत विविध टीव्ही चॅनल आणि सोशिअल मीडिया मध्ये त्यांची क्लिप वायरल होत आहे.या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या कडे रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.।
प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिला वर्गाच्या भावना दुखावल्या असून महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन दरेकर यांनी महिलांच्या विनयशीलतेचा अपमान केला आहे.तसेच अश्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवून दोन गटांमध्ये तेढ निर्माण केली आहे.सदर वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला मलिन व बदनाम केले आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य हा दखलपात्र गुन्हा असून त्यांच्याविरुद्ध कलम १५३ बी ५०० व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती कारवाई करावी असे ही बेबीताई उईके यांनी नमूद तक्रारीत मागणी केली आहे.यावेळी उपस्थित जिल्हाउपाध्यक्ष वंदना आवळे सरस्वती गावंडे उपस्थित होत्या.

दिनचर्या न्युज