राजुराच्या पुर्वा खेरकर यांना राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर
दिनचर्या न्युज :-
राजुरा (चंद्रपूर)- नाशिकच्या क्रीडा संस्कृती फाउंडेशन तर्फे क्रीडा व संस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना दरवर्षी राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शिका कुमारी पूर्वा गणेशराव खेरकर यांच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व मार्गदर्शन याची दखल घेत, क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक तर्फे 2021 चा राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार नाशिक येथे दिनांक 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात येईल अशी माहिती फाऊंडेशनचे सरचिटणीस श्री उदय खरे यांनी दिली आहे.
पूर्वा खेरकर हिला राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूर चे अध्यक्ष श्री दिलीप जयस्वाल, सचिव श्री सुरेश अडपेवार, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉक्टर राकेश तिवारी, सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद यादव, टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अनिस खान, हव्याप्र मंडळ चे प्राध्यापक डॉक्टर अजयपाल उपाध्याय, गुरुकुलचे संस्थापक डॉक्टर अनिल कुमार करवंदे, श्री रसिकलाल वारकरी, श्री हरिश्चंद्र विरकर, श्री किशोर चिंचोलकर, कुमारी वर्षा कोयचाडे, प्रा. विकी पेटकर, श्री मयूर खेरकर यांनी पुर्वा चा सन्मानाबाबत तिचे अभिनंदन केले व सहर्ष शुभेच्छा दिल्या.