अबब, : दारू विक्रीचा रेकॉर्ड, अवघ्या तीन दिवसात एक कोटीच्या वर विकल्याचा आकडा !
- दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आ. जोरगेवार यांच्या पोलिस अधिक्षकांना प्रत्यक्ष भेटून सुचना!
मद्यपींची गर्दी आणि कोविड19 नियमांची पायमल्ली !
दारूबंदी उठल्यानंतर पहिल्या ३ दिवसात सुमारे 1 कोटीं रूपयांच्या वर दारू तळीरामांनी रिचविल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच जुलै पासून चंद्रपूरात दारू सुरू झाली. कोविड-19 घ्या शासन निर्देशांची काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्य उत्पादन विभागाकडून परवानाधारकांना देण्यात आले आहे. सकाळी सात ते चार वाजेपर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्यात येत आहे, त्यामुळे मद्यपींनी एकच गर्दी दुकानासमोर केली आहे. मद्यपींच्या अतिउत्साहामुळे प्रत्येक दुकानात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी बघायला मिळत आहे आणि हीच गर्दी रस्त्यावर सुद्धा ओसंबबळून येत आहे. मास्क लावलेले दृश्य फार कमी ठिकाणी बघायला मिळत आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी तर कुठे कुठे पोलिसांना सुद्धा पाचारण करावे लागले. ही स्थिती आज जिल्ह्यात निर्माण झाली आहे. कोरोना ची येणारी तिसरी लाट बघता कोविड-19 च्या शासन निर्देशांचे पालन काटेकोर व प्रामाणिकपणे व्हायला हवे. त्याच नियमांची पायमल्ली आज जिल्ह्यात होताना दिसत आहे. आज नुकतीच आमदार जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून केलेल्या सुचनांवर पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
चंद्रपूर : चंद्रपूरातील दारुबंदी उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअरबार व देशी दारुची दुकाने सुरु झाली आहे. त्यामूळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. तसेच अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे हि बाब लक्षात घेता उद्भवत असलेल्या तसेच भविष्यात उद्भवणार असलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत केल्या आहे. चंद्रपूकरांची मागणी लक्षात घेता जिल्हातील दारुबंदी उठविण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हातील दारु दुकाने सुरु करण्यात आली आहे. मात्र काही बार मालक व देशी दुकान मालक दुकानाबाहेरच दारु विक्री करतांना दिसून येत आहे. तर काही मद्यविक्रीच्या दुकांनापूढे मध्यप्रेमींची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. या सबंधित त्यांनी आज पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली असून त्यांना अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहे. दारु सुरु झाल्याने अवैध दारु विक्री करणा-या गुंड प्रवृतीच्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामूळे त्यांच्याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवावे तर काही अतिउत्साही मध्यप्रेमींमूळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावंरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहे.