दि 26 जून 2021 ला ओबीसी जनगणना समन्वय समिती चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
विविध आघाड्याच्या माध्यमातून जिल्हाभर संघटन बांधणीचा निर्णय. 26 नोव्हे 2021 ला संविधान दिनी ओबीसीचे भव्य जिल्हा अधिवेशन घेण्याचा निर्णय
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर येथे दि 26 नोव्हेंबर 2020 ला संपन्न झालेल्या विशाल ओबीसी मोर्चा नंतर ओबीसी जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक दि 26 जून 2021 ला सिटी प्लाझा इमारत, जटपुरा गेट जवळ चंद्रपूर येथे दु 11.30 ते 1.30 दरम्यान जेष्ठ विधिज्ञ् ऍड दत्ताभाऊ हजारे यांचे अध्यक्षतेखाली व मुख्य संयोजक बळीराज धोटे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली. त्यात सर्व संमतीने खालील निर्णय घेण्यात आले.
1) ओबीसी जनगणना समन्वय समितीचे पुनरगठन करणे : चर्चे अंती असे ठरविण्यात आले की विध्यमान समन्वय समिती तशीच ठेऊन नव्याने विविध आघाड्या चे प्रमुख म्हणून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समन्वय समिती मध्ये समावेश करण्याचे ठरविण्यात आले.
2) ओबीसी च्या संविधानिक हक्क अधिकाराची समाजाच्या तळागाळातील घटकांना जाणीव करून देण्यासाठी व प्रचार प्रसार करण्यासाठी विविध आघाड्यांची स्थापना करणे. यात
*I. ओबीसी शासकीय कर्मचारी व शिक्षक आघाडी* : या आघाडीची जबाबदारी ओबीसी सतीश बावणे व ओबीसी सतीश मालेकर यांचेकडे सोपविण्याचे ठरले. पुढील महिना भराचे काळात जिल्ह्यातील शासकीय ओबीसी कर्मचारी व शिक्षकांची बैठकीचे आयोजन सतीश बावणे व सतीश मालेकर यांचेवर सोपविण्यात आले.
*II. ओबीसी कामगार आघाडी* चंद्रपूर जिल्हा हा विविध उद्योग व खाणी चा जिल्हा आहे. या खाणी व उद्योगात हजारो कामगार काम करतात. त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधानिक हक्क अधिकार कळावे तसेच उद्योग व्यवस्थापणे कायदेशीर संरक्षण द्यावे, शोषण होऊ नये यासाठी ओबीसी कामगार आघाडीच्या माध्यमातून संघटन बांधणी व प्रबोधन करण्याचे ठरले. यासाठी दिनेश पारखी, बंडूभाऊ हजारे, भास्कर सपाट, सुधाकर काकडे व विवेक कुठेमाटे यांना अधिकार देण्याचे ठरविण्यात आले. आगामी दोन महिन्याचे काळात संबंधित क्षेत्रातील लोकांची व्यापक बैठक वरील मान्यवर करतील.
क. ओबीसी शेतकरी आघाडी : जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी ओबीसी आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी संविधानिक हक्क अधिकाराची जाणीव करून देणे तसेच ओबीसी जनगणना झाल्यास एससी एसटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेती विषयक सवलती व अनुदान ओबीसी शेतकऱ्यांना मिळेल असा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून सर्व मिळून करतील असे ठरले. ओबीसी शेतकरी आघाडीची जबाबदारी मा मोरेश्वर पाटील सुरकर व मंगेश पोटवार यांचेकडे देण्यात आली. या संदर्भातील व्यापक बैठक घेऊन गाव पातळीवर प्रबोधन कार्यक्रम घेण्याचे ठरले.
*III : ओबीसी विध्यार्थी व युवक आघाडी*: ओबीसी च्या संविधानिक हक्क अधिकाराचे खरे हकदार ओबीसी विध्यार्थी व युवक आहेत. या साठी महाविद्यालयीन स्तरावर ओबीसी उद्यार्थ्यां व युवकांची संघटन बांधणी करणे. या आघाडीची जबाबदारी सौरभ होरे, विपीन देऊळकर, समीर अल्लू्रवार, व रोहित निकुरे यांचेवर देण्यात आली.
*IV. जेष्ठ नागरिक व सेवानूवृत्त कर्मचारी आघाडी.* ओबीसी मधील हजारो कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहे. त्यांचेही ओबीसीच्या पुढील पिढीचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी आधार व्हावा या दृष्टीने ही आघाडी jसेवानिवृत्त कर्मचारी क्षेत्रात ओबीसी संघटनेची बांधणी व प्रबोधन करेल. यासाठी इंजि एल व्ही घागी, नामदेवराव मुसळे, पांडुरंगजी गावतुरे यांचे पुढाकारणे कार्य करेल. लवकरच इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विचार विमर्ष करून व्यापक स्तरावरील बैठकीचे आयोजन ही आघाडी करेल.
*V. ओबीसी प्राध्यापक कक्ष* : खाजगी शैक्षणिक संस्था, इंजिनिअरींग कॉलेज, ई ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाचे प्राध्यापक आहेत. या सर्व प्राध्यापक मंडळीना ओबीसीच्या उज्वल भविष्यासाठी समाजाप्रती जागरकता वाढविण्यात प्राध्यापक मंडळी कडून मोठे योगदान मिळविण्याचे दृष्टीने ओबीसी प्राध्यापक आघाडीचे माध्यमातून प्रयत्न करण्याचे ठरले. या आघाडीची जबाबदारी प्रा सिर्यकांत खनके, प्रा माधव गुरनुले, प्रा रवींद्र चिलबुले व प्रा अनिल डहाके यांचेवर देण्यात आली.
*VI. विधी व कायदे विषयक कक्ष* : कायदे विषयक बाबी समजून घेणे, त्यातील खाचा खळगे समजून घेऊन विविध कायाद्या विषयी व संविधानातील प्रतिनिधित्व किव्हा आरक्षण विषयक बाबी समजून घेऊन कार्यकऱ्यांना प्रशिक्षित व प्रबोधित करण्याच्या उद्धेशाने विधी व कायदेवीषयक कक्ष कार्य करेल. या कक्षाची मुख्य जबाबदारी ऍड दत्ताभाऊ हजारे, हिराचंद बोरकुटे, प्रशांत सोनुले यांचेवर देण्यात आली.
*VII. ओबीसी महिला आघाडी:* महिलांना भारतीय संविधानातील हक्क अधिकार समजावून सांगणे, यासाठी ही आघाडी कार्य करेल. प्रत्येक महिलेला आपल्या मुलाबाळांची जास्त काळजी असते. भारतीय संविधानाने ओबीसी युवकांचा शासन प्रशासनातील सहभाग वाढावा, ओबीसी युवक निर्णय प्रक्रियेत जावा, अधिकारी व्हावा, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्ह्यावा, सरकारी व खाजगी कंपण्यांचा संचालक व्हावा या दृष्टीने महिलांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. यासाठी ओबीसी महिला व युवती आघाडी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लवकरच जागरूक ओबीसी महिलांची बैठक घेऊन ओबीसी महिला व युवती आघाडीचे कार्य सुरु करण्याचे ठरले.
*VIII. ओबीसी व्यापारी आघाडी :* जिल्ह्यात विविध व्यवसायात ओबीसी समाजातील व्यक्ती आपल्या कुवती नुसार व्यापार करीत आहे. जिल्ह्यात ओबीसी समाज मुख्य ग्राहक किव्हा उपभोक्ता आहे. व्यापाराने व्यक्ती आत्मनिर्भर होतो व इतरांना रोजगार देण्याची क्षमता ही व्यक्ती मध्ये निर्माण होते. जो समाज व्यापारात व्यस्त आहे तो समाज आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. यासाठी ओबीसी चे जे लोक व्यापारात कार्यरत आहे त्यांची व्यापारश यादी तयार करून व्यापार वाढीसाठी मदत करणे, कायदे विषयक मार्गदर्शन व संरक्षण देणे तसेच युवकांनी व्यापारत यावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यासाठी ओबीसी व्यापार व व्यवसाय आघाडी ची स्थापना करण्याचे ठरले. या दृष्टीने मुख्य संयोजक बळीराज धोटे च्या मार्गदर्शनात ओबीसी व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचे ठरले.
*3. ओबीसी चे जिल्हा अधिवेशन घेणे* आगामी चार महिन्यात वरील विविध आघाड्यांचे माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी जनगणना समन्वय समितीची भक्कम बांधणी करून आगामी 26 नोव्हे 2021 ला संविधान दिनी भव्य ओबीसी जिल्हा अधिवेशन घेण्याचे ठरले. अधिवेशनात ओबिशीच्या संविधानिक हक्क अधिकारा विषयी विविध विषयातील तज्ञ् निमंत्रित करून मार्गदर्शन करतील असे ठरले.
वरील विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी सर्व आघाड्यांच्या कार्याचे महत्व विषद केले व सर्वांनी परस्पर सहकार्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यकर्त्यांना मा मोरेश्वर पाटील सुरकर, डॉ अशोक कुडे, सतीश बावणे, हिराचंद बोरकुटे, इंजि सूर्यभान झाडे, प्रा रवींद्र चिलबुले, मंगेश पोटवार ई नी मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषांनातून ऍड दत्ताभाऊ हजारे यांनी सर्वांनी ओबीसी चळवळीचे काम वाढविणे कां जरुरीचे आहे, आपले हक्क व्यवस्थेतील चलाख लोक कसे हिरावून घेत आहे हे सांगितले. ओबीसी समाजाचं मोठं हित साधण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीचे उत्कृष्ट संचलन सतीश बावणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा अनिल डहाके यांनी केले.
बैठकीला चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नास वर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनचर्या न्युज