भिसी पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ?
भिसी :- दिनचर्या न्युज
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली तेव्हा पासून भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैद्य धंद्यावाल्यानी आपले जमकट बसवले असून गल्लोगल्ली, खेड्यापाड्यात अवैध दारू विक्री, सट्टा पट्टी जोमात सुरू आहे. मात्र यात काही पोलीस विभागातील, व होमगार्ड असलेले कर्मचारीच या धंद्यात गुंतलेले असल्याची चर्चा सध्या भिसी परिसरात खमंग सुरू आहे.जर 'कुंपणच शेत खात असेल तर'!,....!
भिसी हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असून नागपूर जिल्हाची हद्द लागून असल्याने बेमाफ दारूचा पुरवठा होतो. अनेक बेरोजगार, बालवयातील मुले अवैध दारू विक्री करीत असताना सुद्धा येथील पोलीस निरीक्षक यांचे कुठलेही वचक राहिले नसुन उलट या धंदेवाल्यांना पाठबळ तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. या परिसरात होत असलेले अवैध धंद्यांना बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस निरीक्षक जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.