चंद्रपूर नाभिक समाजाच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांचे जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन!
चंद्रपूर :दिनचर्या न्युज -
अनेक वर्षापासून नाभिक समाजातील प्रलंबित असलेल्या मागण्याचे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात आज महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही नाभिक समाजाची नोंदणीकृत संघटना असुन सदरील संघटनेमार्फत समाजाचे सामाजिक, आर्थिक, व राजकीय प्रयत्न केल्या जातो. त्या साठी वेळोवेळी शासनस्तरावरील प्रश्नांच्या अनुषंगाने संघटना प्रयत्न करीत आहेच तथापि या बाबत आपला सहभाग व मदतीची आवश्यकता आहे.
संघटनेच्या माध्यमातुन संदर्भीय प्रत्रान्वये मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना नाभिक समाजाच्या मागण्याचे निवेदन सादर केले असून, त्या साठी संघटना पाठपुरवा करत आहे. आपण लोकप्रतिनिधी या नात्याने संदर्भीय निवेदनातील प्रलंबित मागण्याबाबत विधानसभेत । विधानपरिषदेत मुद्दे उपस्थित करुन आपण त्याचा शासनाकडे पाठपुरावा करावा अशी आपेक्षा आहे. आपल्याला या निवेदनाव्दारे विनंती करण्यात येते की, आपण मा.ना.श्री उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करावी हि नम विनंती. शासनाकडे प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याचे निवेदन आज दिनांक 25 जानेवारी 2021 ला चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे, यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, माजी अध्यक्ष तसेच बाराबलूतेदार महा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने, जिल्हा उपाध्यक्ष कवडूजी खोबरकर, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, दत्तूभाऊ कडूकर, राजू कोंडस्कर, अविनाश मांडवकर, सुनील कडवे, विजय महागांवकर, अक्षय चौधरी, अभय देवईकर, यांची उपस्थिती होती. तसेच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर तुरंतपत्र देवून सभागृहात नाभिक समाजातील प्रलंबित मागण्यांसाठी वेळ मागितले जाईल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले. आणि भाऊंनी एकदा
शब्द दिला म्हणजे, काळ्या दगडावरची रेघ! असे म्हणतात?
1) बराबलुतेदाराच्या विकासासाठी बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपये चा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
२) कोरोणा कालावधी मध्ये आत्महत्या गुस्त नाभिक समाजबांधवास दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे.
3) दि.२६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्राप्रमाणे समाजाच्या अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावी.
४) प्रतापगडावर शुरविर जिवा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतुद उपलब्ध करुन द्यावी.
५) स्वातंत्र लढ्यातील झुंजार क्रांतीविर हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारसाठी सबलीकरण योजना राबवावी ,
६) रोहीणी आयोगाची अमलबजावणी करावी,
७) नाभिक समाजाच्या सलुन कारागिरास दरमहा रुपये १५,०००/- निवृत्ती वेतन (पेशन) लागु करावी.
मा. महोदय वरील समाजाच्या प्रलंबित मागण्यापुर्ण होण्यासाठी आपण शासनाकडे शिफारस करावी हि विनंती.