27 जानेवारी पासून राज्यातील 5 ते 8 वर्ग नियमित सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय!





27 जानेवारी पासून राज्यातील 5 ते 8 वर्ग नियमित सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय!

दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
राज्यातील ५ ते ८ चे वर्ग २७ जानेवारीपासून नियमित सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती आहे.
शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
कोरोणाच्या काळात पाचवी ते आठवी चे वर्ग बंद होते. मात्र कोरोणाचे सर्व काळजी घेण्याच्या सूचना देत या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.