चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याची (आत्म) हत्या ?
कारागृह प्रशासनाकडून पत्रकारांना माहिती देण्यास विलंब !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये एका कैद्याने आत्महत्या केल्याचे वृत्त मिडीयाला कळले, मिडीयाने यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक खैरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा कारागृह प्रशासनाने प्रसार माध्यमांना दिली नाही. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु शहर पोलीस स्टेशन मधून याबद्दलची अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु अशी घटना घडली असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे सुधाकर अंभोरे यांनी पत्रकारांना दिली, मग जिल्हा कारागृह प्रशासनाने ही माहिती चार तास पर्यंत मीडिया सोबत का बरे लपवून ठेवली? याबद्दलची चर्चा मिडियामध्ये होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली, ही माहिती सत्य आहे कां? याची माहिती घेण्यासाठी मीडिया कर्मीनी थेट शहर पोलीस स्टेशन गाठले.. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी अशी घटना घडली आहे पण त्याची सविस्तर माहिती आमच्यापाशी नाही अशी माहिती मीडियाला दिली. त्यानंतर मीडीयांने जिल्हा कारागृहाला धडक दिली असता त्या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पावेतो कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा कारागृहाने मीडियाला दिली नाही परंतु अशी घटना घडली याबद्दल जिल्हा कारागृह मध्ये चर्चा सुरू होती. मग एखादी घटना घडत असेल तर त्याला मीडियासमोर येऊन अधिकृत माहिती न देण्याचे कारण काय ? याबाबत जिल्हा कारागृहाने स्पष्ट करायला हवे.
मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी जिल्हा कारागृहातील एका कैद्याने (?) आत्महत्या केली, जिल्हा कारागृहांमध्ये कडेकोट बंदोबस्त असतो. एखादा कैदी आत्महत्या कसा काय करू शकतो? त्याची अधिकृत माहिती मीडियाला देण्यास संबंधीत जिल्हा कारागृह विलंब कां करतो ? दुर्घटना घडली याची अधिकृत माहिती संबंधित विभागाने काही अवधीमध्ये प्रसारमाध्यमांना द्यायलाचं हवी? जिल्हा कारागृह मध्ये आज घडलेली घटना ही जिल्हा कारागृहाचे वाभाडे काढणारी आहे. त्यातही प्रसारमाध्यमांना त्याबद्दलची अधिकृत माहिती ही जिल्हा कारागृहाने द्यायलाच हवी मग त्यासाठी प्रसारमाध्यमांना ताटकळत ठेवणे आणि त्यांचे कोणतेही फोन न उचलणे? त्यांना माहिती पासून दूर ठेवणे? ही बाब संशय निर्माण करणारी आहे, जिल्हा कारागृह प्रशासनाने मृत्यू कुणाचा झाला? कसा झाला? याबद्दल अधिकृतपणे जाहीर न करणे म्हणजे संशयाला बळ देणे आहे. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा कारागृह प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांना मिळालेली नाही, परंतु जिल्हा कारागृहामध्ये आज एका कैद्याने (आत्म?)हत्या केली असे सांगितल्या जाते.