हजारो वर्ष ओबीसीला ज्ञान आणि धना पासून कुणी वंचित ठेवले-बळीराज ढोटे
दिनचर्या न्युज :-
दि 12 डिसेंबर 2020 ला सायंकाळी 8 ते 9 वाजे दरम्यान वाढोली ता गोंडपिपरी जि चंद्रपूर येथे ओबीसी कृती समिती वाढोली व गोंडपिपरी चे वतीने जाहीर सभा संपन्न झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी चे जेष्ठ नेते मा मोरेश्वरजी सुरकर होते. मंचावर इंजि सूर्यभान झाडे, डॉक्टर बाळकृष्ण भगत, सेवानिवृत्त ITI प्राचार्य नवनाथ देरकर होते. प्रास्ताविक प्रा सुनील फलके यांनी केले तर आभार संदीप लाटकर यांनी मानले. संचालन प्रा. रमेश हुलके यांनी केले. या प्रसंगी डॉ अशोक कुडे यांनी ओबीसी च्या व्यथावर गीताद्वारे प्रकाश टाकला.
सभेला मार्गदर्शन करताना बळीराज धोटे यांनी ओबीसी म्हणजे कोण, ओबीसीचे देशाच्या जडण घडणितील मुख्य योगदान, ओबीसी सरकार ला देत असलेला टॅक्स, ओबीसी ची विविध माध्यमातून सत्तेतील लोकांद्वारे आणि व्यापारी वर्गाद्वारे होणारी लूट, पूर्वी हजारो वर्ष ओबीसीला ज्ञान आणि धना पासून कुणी वंचित ठेवले, आजही ओबीसीची मुले शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी पासून कसा दूर ठेवल्या जातो, ढोरा डुकराची मोजणी करणारे सरकार मागील 90 वर्षांपासून ओबीसीची जनगणना करीत नसल्याने ओबीसीचे, शैक्षणिक, नोकरी विषयक, स्कॉलरशिप विषयक, हॉस्टेल विषयक, शेतीतील सुविधा विषयक, प्रशासनातील संवाईधानिक हिस्सा कसा हिरावत आहे आणि न्यायालयीन व्यवस्था उच्च वर्णीयांना ओबीसीचे हक्क हिरवान्यास कसे मदत करीत आहे याची मुद्धेसूद माहिती दिली. ओबीसीनी विविध राजकीय पक्षाच्या पुढऱ्यांना आपल्या संवैधानिक हक्का विषयी जाब विचारावा व आपले हक्क अधिकार मिळविण्यासाठी व्यवस्थेतील लोकांशी सामूहिक संघर्ष करावा, आम्हाला साथ द्यावी असे आवाहन केले. सभेच्या यशस्वीतेसाठी गोंडपिपरी व वाढोली येथील ओबीसी कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्न केले.
दिनचर्या न्युज