अंचलेश्वर गेट, महाकाली मंदिर ते बागला चौक रस्त्यावर जीवघेणे खड्डे!
चंद्रपूर:- दिनचर्या न्युज
जिल्ह्यातीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले माता महाकाली मंदिर, याच मंदिराकडे जाणारा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यावर रोजचेच छोटे-मोठे अपघात होत असून, भविष्यात मोठा अपघात होण्याचे नाकारता येत नाही. रस्त्याची दैनावस्था पाहून" रोज मरे त्याला कोण रडे" असे म्हटले तर वावगे ठरू नये!
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या रोडच्या डीवाईडरवर मनपाकडून सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपयाच्या खर्च केला गेला. या कामाचे कंत्राट व्यवस्थापनाचे काम एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. काही दिवसापूर्वी थोडीशी या रस्त्याच्या सौंदर्यीकरणात चांगली भर पडली होती. आता मात्र 'जैसे थे! अशी परिस्थिती झाली असून रोडच्या दोन्ही बाजूला जीव घेणारे खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावर शहरात. अमृत कलश योजनेतून मुख्य पाण्याची पाईपलाईन
टाकण्यासाठी खाजगी कंपनीने खोदलेले रस्ते सपाट न करता तसेच खोदलेले मातीचे डिगारे रस्त्यावर अस्ता वेस्त पसरून ठेवले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी या वार्डातील नगरसेविका सौ. कल्पना लहामगे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार यांना पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या रोडच्या संदर्भात लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रोडचे काम करण्याची मागणी वार्डातील नागरीकांनी केली आहे.
दिनचर्या न्युज