अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा, ईरई नदी रेती तस्करांचे माहेरघर?




अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा

ईरई नदी रेती तस्करांचे माहेरघर?

@ वाहन जप्त करून दंड वसूल
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :-
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा- बल्लारपुर मार्गावर विना परवाना रेती वाहतूक करणार्‍या वाहन क्र. एम.एच. 34 एबी 1761 जप्त करून तहसिलदार पोभूर्णा यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द केले.
तसेच दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता मौजा विचोडा ता. चंद्रपूर येथे इराई नदी घाटावर रवींद्र वाढरे रा. विचोडा यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र. एम. एच. -34 एल 2001 द्वारे अवैध रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर ट्रक्टर जप्त करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून एक लाख 10 हजार 900 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उक्त वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

इरई नदी अवैध रेती तस्कराच माहेर घर?

चंद्रपूर जिल्ह्यातील वाहणारी जल वाहिनी म्हणजे इरई नदी, या नदीवर इरई डॉम असून येथूनच या नदीचा उगम झाला आहे. असे असले तरी या नदीच्या पात्रातून अवैध रेतीचा उपसा हा सरळ जमनजेठी ते वर्धा नदीच्या पात्रात परेंत वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.
महसूल विभागाच्या पथकाने अनेकदा कारवाई केल्या, पण पुन्हा जैसे थे! हा प्रकार नेहमीच होत असताना सुद्धा वाळू तस्करी काही केल्या रोखली जात नाही!
दर दिवसाला पहाटे पासूनच रेतीची खुलेआम चोरी होत असुन शासनाचा लाखोंचा महसूल हा बुडत आहे.
या नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल खड्डा खणून नदीचे अस्तित्व धोक्यात असून पर्यावरणाचाही धोका निर्माण झाला आहे.
अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. पण याचा काही फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक वाळू तस्करांचे कर्मचारी व अधिकारी यांच्या सोबत साटे लोट असून कारवाई पुर्वीच त्यांना सुचना होत असल्याची कुजबुज आहे.
म्हणून या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष केंद्रित करून ठोस कारवाई करण्याची गरज आहे.