तळोधी , आलेवाही , राजोली , केळझर रेल्वे स्थानकांवर नवीन प्लाँटफार्म व पथपुल निर्मितीस मंजुरी




तळोधी , आलेवाही , राजोली , केळझर रेल्वे स्थानकांवर नवीन प्लाँटफार्म व पथपुल निर्मितीस मंजुरी

मेंढा ( कि.) येथील प्लाटफार्मची उंची वाढणार *



• *दपुम रेल्वे झोनल कमेटी सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याला यश ...*

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चांदाफोर्ट-नागभीड-गोंदिया या रेल्वे मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर एकच प्लाँटफार्म असुन एकाचवेळी दोन रेल्वे गाड्या आल्यावर प्रवाशांची गाडीतून चढउतार करण्यासाठी मोठी कसरत होते. वृध्दांसह महिला व लहान प्रवाशांना याचा खुपच त्रास होतो. अगदी कमी वेळात ही कसरत करावी लागत असल्याने अनेकदा अपघात सुध्दा झाले आहेत. ही अडचण व समस्या लक्षात घेता दक्षिण पुर्व मध्य रेल्वे चे झोनल कमेटी सदस्य व भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाला अवगत केले होते.
जानेवारी महिन्यात बिलासपुर येथे झालेल्या दपुम झोनल रेल्वे बैठकीत संजय गजपुरे यांनी या मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवरील प्लाँटफार्म ची उंची वाढविण्यात यावी , रेल्वे क्राँसिंग होणाऱ्या स्थानकांवर अतिरिक्त नवीन प्लाँटफार्म ची निर्मिती करण्यात यावी तसेच एका प्लाँटफार्म वरुन दुसऱ्या प्लाँटफार्म वर जाण्यासाठी पथ पुल  ( फुट ओव्हर ब्रिज ) बनविण्याची प्रकर्षाने मागणी मांडली होती. खासदार अशोकभाऊ नेते यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात फेब्रुवारी महिन्यात भारताचे रेल्वे मंत्री मान.पियुषजी गोयल यांनाही निवेदन देऊन लवकरात लवकर सदर मागणी पुर्ण करण्याची मागणी संजय गजपुरे यांनी केली होती. 
                  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर व खासदार अशोकभाऊ नेते यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याने अखेर मंजुरी मिळाली असल्याने प्रवाशांना होणाऱ्या या सर्व अडचणी दुर होणार आहेत. सध्या तळोधी(बाळापुर ), आलेवाही , राजोली , केळझर या रेल्वे स्थानकांवर एक अतिरिक्त नवीन प्लाँटफार्म व पथपुलांची निर्मिती होणार आहे. तसेच मेंढा ( किरमिटी ) स्थानकावरील प्लाँटफार्म ची उंची वाढविण्यासाठी सुद्धा मंजुरी प्राप्त झाली आहे. 
                    प्रवाशांची ही मोठी समस्या आता दुर होणार असल्याने  रेल्वे मंत्री मान. पियुषजी गोयल तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर व  गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले आहे.

दिनचर्या न्युज